Tarun Bharat

बिहारी कामगारांवर काश्मीरमध्ये गोळीबार

Advertisements

पुलवामा येथील घटनेत दोघे अत्यवस्थ

श्रीनगर / वृत्तसंस्था

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथील खरभाटपोरा रत्नीपोरा गावात शनिवारी दहशतवाद्यांनी दोन बिहारी मजुरांना गोळय़ा घातल्या. दोघेही बिहारमधील बेतिया जिह्यातील रहिवासी आहेत. शमशाद अहमद आणि फैजान कादरी अशी या मजुरांची नावे आहेत. दोघांची प्रकृती स्थिर असल्याचे उपचार करणाऱया वैद्यकीय अधिकाऱयांकडून सांगण्यात आले. त्यांच्यावर सध्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आणि शोधमोहीम सुरू केली. मात्र, रात्री उशिरापर्यंत हल्लेखोरांचा शोध लागला नव्हता.

यापूर्वी 11 ऑगस्ट रोजी जम्मू-काश्मीरमध्ये टार्गेट किलिंगची घटना उघडकीस आली होती. जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा जिह्यातील सदुनारा गावात दहशतवाद्यांनी एका मजुराची गोळय़ा झाडून हत्या केली. हा मजूर बिहारमधील मधेपुरा जिह्यातील रहिवासी होता. मोहम्मद अमरेज (19 वर्षे) असे त्याचे नाव होते. त्यानंतर जवळपास दीड महिन्यांनंतर पुन्हा बिहारी कामगारांना टार्गेट करण्यात आले आहे.

Related Stories

अखेर बाबा रामदेव यांनी मागितली महिलांची माफी; म्हणाले…

datta jadhav

हजारो शेतकऱयांची दिल्लीकडे कूच

Patil_p

पीएम केअर फंडातील व्हेंटिलेटर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘दोनों फेल’ : राहुल गांधी

Tousif Mujawar

दिल्ली : मागील 24 तासात 91 नवे रुग्ण; 110 जणांना डिस्चार्ज 

Tousif Mujawar

भारतीय सैनिकांकडून गलवान व्हॅलीमध्ये नवीन वर्ष साजरे

Abhijeet Khandekar

पद्म पुरस्कारांची घोषणा; सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री

Archana Banage
error: Content is protected !!