Tarun Bharat

केएलई चॅरिटेबल-हिंदू जनजागृती समितीतर्फे प्रथमोपचार कार्यशाळा

बेळगाव : केएलई सेंटेनरी चॅरिटेबल हॉस्पिटल, येळ्ळूर व हिंदू जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथमोपचार कार्यशाळा पार पडली. समितीच्या कार्यकर्त्यांसाठी हॉस्पिटलच्या पिडीअॅट्रिक्स विभागाच्यावतीने ही कार्यशाळा डॉ. एस. सी. धारवाड व डॉ. क•ाr यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी आणीबाणी परिस्थितीत रुग्णाला प्रथमोपचार कसे द्यावेत, याचे पॉवरपॉईंटद्वारे सादरीकरण करण्यात आले. रबरी मानवी पुतळ्याच्या साहाय्याने रुग्णाला कृत्रिम श्वासोच्छ्वास कसा द्यावा, याचीही माहिती देण्यात आली. 40 हून अधिक जणांनी कार्यशाळेचा लाभ घेतला.

कार्यशाळेचा हेतू डॉ. नम्रता कुट्रे यांनी स्पष्ट केला. ‘प्रथमोपचार प्रशिक्षणाची आवश्यकता’ या विषयावर समितीचे समन्वयक ऋषिकेश गुर्जर यांनी विचार मांडले. डॉ. श्रीनिवास एस., डॉ. संतोष करोशी, डॉ. बसवराज, डॉ. अनिता व सीमा यांनी मार्गदर्शन करून प्रात्यक्षिकांचा सराव करून घेतला.

Related Stories

आसनाअभावी प्रवाशांची गैरसोय

Omkar B

खानापूर सरकारी दवाखान्यात 25 रोजी महाआरोग्य शिबिर

Amit Kulkarni

परप्रांतीय कामगारांची होतेय ससेहोलपट

tarunbharat

हेरवाडकर स्कूलमध्ये आकाशकंदील प्रदर्शनाचे उद्घाटन

Amit Kulkarni

कडोली साहित्य संमेलनात मराठीचा जागर

Amit Kulkarni

कारागृहातील सात अधिकाऱ्यांना नोटिसा

Amit Kulkarni