वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनने इलाईट फुटबॉल सामन्यासाठी पंच आणि साहाय्यक पंचांची पहिली अधिकृत यादी जाहीर केली असून त्यांना पूर्ण वेळेसाठी कराराची ऑफर देण्यात आली आहे.
अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशन आणि त्यांचे व्यावसायिक भागीदार यांच्या संयुक्त विद्यमाने इलाईट रेफ्री विकास योजना तयार करण्यात आली. 2047 सालावर दृष्टीक्षेप ठेऊन ही योजना राबविली जाणार आहे. अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनतर्फे घोषित करण्यात आलेल्या व्यावसायिक पंचांच्या पहिल्या यादीमध्ये एकूण 8 प्रमुख पंच तसेच 8 साहाय्यक पंचांचा समावेश आहे. आता फुटबॉल फेडरेशनतर्फे व्यावसायिक पंचांची पुढची यादी 2024 साली घोषित केली जाईल, अशी माहिती फेडरेशनचे प्रमुख कल्याण चौबे यांनी दिली.