शेअर करण्यात आले डिझाइन
मध्य अमेरिकेतील सर्वात छोटा देश अल साल्वाडोरचे अध्यक्ष नायब बुकेले यांनी बिटकॉइन शहराचे डिझाइन प्रसिद्ध केले आहे. बुकेले यांनी सोशल मीडियावर क्रिप्टो शहराच्या मॉडेलची छायाचित्रे शेअर केली असून याची निर्मिती फोन्सेकामध्ये कोंचगुआ ज्वालामुखीनजीक केली जाणार आहे.
चालू वर्षाच्या अखेरपर्यंत या बिटकॉइन सिटीचे निर्मितीकार्य सुरू होणार आहे. अध्यक्ष बुकेले हे बिटकॉइन प्रेमी असून अल साल्वाडोरने सप्टेंबरमध्ये बिटकॉइनला कायदेशीर मान्यता दिली होती. अशाप्रकारचा निर्णय घेणारा हा पहिला देश ओ. या देशाने क्रिप्टोमध्ये लाखो डॉलर्सची गुंतवणूक केली आहे.
अमेरिकेतील नॅशनल ब्युरो ऑफ इकॉनॉमिक रिसर्चच्या एका नव्या सर्वेक्षणानुसार साल्वाडोरचे केवळ 20 टक्के लोक बिटकॉइनचा वापर करत आहेत. तेथील बहुतांश लोक अद्याप डॉलरवर निर्भर आहेत. बिटकॉइनला अधिकृत स्वरुपात स्वीकारण्यात आल्यास वित्तीय स्थैर्य आणि ग्राहक संरक्षणासाठी मोठी जोखीम निर्माण होऊ शकते असा इशारा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने दिली आहे.
बिटकॉइन शहर
शहर प्रथम टेकापा प्रकल्पातून संचालित केले जाईल, मग कोंचागुआ प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. या प्रकल्पाकरता अल साल्वाडोर 1 अब्ज डॉलर्सचे बिटकॉइन बाँड चालू वर्षात जारी करणार आहे. म्हणजेच या शहराची सुरुवात बिटकॉइनने होणार आहे.
भरावा लागणार नाही कर
या बिटकॉइन शहरात राहणाऱया लोकांना केवळ व्हॅट द्यावा लागणार आहे. म्हणजेच येथे कधीच प्राप्तिकर भरावा लागणार नाही. येथे कॅपिटल गेन टॅक्स, प्रॉपर्टी टॅक्स, पेरोल टॅक्स शून्य असणार आहे.