Tarun Bharat

देवगड हापूसची पहिली पेटी वाशी मार्केटला रवाना

First box of Devgad Hapoos left for Vashi market

देवगड तालुक्यातील कातवण येथील आंबा बागायतदार दिनेश दीपक शिंदे व प्रशांत सिताराम शिंदे या दोन युवा आंबा बागायत दारांनी आपल्या बागेतील हापूसचे पीक चांगल्या पद्धतीने घेऊन देवदिवाळी व मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारचा मुहूर्त साधून आंबा काढण्याचा शुभारंभ करत पहिली दोन डझन ची पेटी नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या पंधराव्यातच मुंबई वाशी मार्केट येथील सुप्रसिद्ध व्यापारी अशोक हांडे यांच्या पेढीवर आज पाठविण्यात आली सकाळी आठ वाजता आंबे काढून या पेटीच्या शुभारंभ करण्यात आला .


कातवण येतील आंबा बागायतदार प्रशांत शिंदे व दिनेश शिंदे यांच्या गोरक्ष गणपती मंदिर या ठिकाणी असलेल्या घरानजीकच्या बागेत असलेल्या हापूसच्या कलमांना 15 ऑगस्ट पासूनच मोहर येण्यास सुरुवात झाली होती. मात्र काही कलमावरील आलेला मोहर गळून पडला मात्र चार ते पाच कलमावरील मोहरा तसाच टिकून राहिला आणि तो टिकवण्यासाठी या शिंदे बंधूंनी खूप मेहनत घेतली. त्यामुळेच या चार कलमांवरती मिळालेल्या आंब्याचे पहिले फळ काढत देवगड हापूसची पहिली पेटी आज मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी काढून शुभ मुहूर्त केला .त्यानंतर त्यापेटीची विधिवत पूजा करून ही पेटी वाशी येथे जाण्यासाठी रवाना झाली स्वतः आंबा बागायतदार शिंदे हे ही आंबापेटी घेऊन वाशी मार्केटला रवाना झाले आहेत.

देवगड / प्रतिनिधी

Related Stories

आदर्श शाळांच्या अंतिम यादीत सिंधुदुर्गातील नऊ

NIKHIL_N

दाभोळ बंदरात 24 हजार लिटर डिझेल साठा जप्त

Patil_p

पालगडावर सापडले तब्बल 22 तोफगोळे

Patil_p

एसटीच्या गोदामासाठी प्रक्रिया गतीमान

NIKHIL_N

तू तिथं मी..!

NIKHIL_N

आचरा समुद्र किनारी स्वच्छता मोहीम

Anuja Kudatarkar