Tarun Bharat

सत्तांतरानंतर पहिली निवडणूक जाहीर, अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघासाठी रंगणार ‘सामना’

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदारांनी शिवसेनेत बंड केले. यांनतर राज्यात सत्तांतर झालं. शिंदेंनी भाजपबरोबर हातमिळवणी करत सरकार स्थापन केलं. पण ‘खरी शिवसेना कोणती’ (Shivsena) यावरुन आता वाद सुरु असून, ‘धनुष्यबाण’ चिन्ह कोणाला मिळणार याकडेही सर्वांचं लक्ष आहे. याबाबत निवडणूक अयोग्य निर्णय घेणार आहे. परंतु पक्षचिन्हाचा तिढा अजून सुटलेला नसताना अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूकही जाहीर करण्यात आली आहे. शिंदे गटाच्या बंडानंतर होणारी ही पहिलीच निवडणूक असल्याने दोन्ही बाजूंनी शक्तीप्रदर्शन होण्याची शक्यता आहे.

अंधेरी (पूर्व) येथील शिवसेना आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांचे १२ मे रोजी निधन झाल्याने या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर कऱण्यात आली आहे. लटके त्यांच्या पत्नींना शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पोटनिवडणुकीसाठी २ नोव्हेंबरला मतदान आणि ६ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. उमेदवारांना १४ ऑक्टोबरपर्यंत अर्ज दाखल करता आहेत. अर्ज मागे घेण्याची मुदत १७ ऑक्टोबरपर्यंत आहे.

हे ही वाचा : काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत मुख्यमंत्रीपदासाठीच आघाडी

Related Stories

आई अंबाबाई महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी ताकद दे ; किरीट सोमय्यांचे अंबाबाईला साकडे

Archana Banage

आसाममधील मोरेगावमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के!

Tousif Mujawar

ओबीसी आरक्षणाबाबत फडणवीस भुलभुलैया करत आहेत -छगन भुजबळ

Archana Banage

कोरोनाने अनाथ झालेली मुले आणि वृद्ध दाम्पत्यांची जबाबदारी दिल्ली सरकार घेणार : मुख्यमंत्री

Tousif Mujawar

सीमाप्रश्न मार्गी लावण्यासाठी पवारांनी काय केले?; राणेंचा सवाल

datta jadhav

जातनिहाय जनगणनेसाठी पंतप्रधान मोदी तयार होतील – नवाब मलिक

Archana Banage
error: Content is protected !!