एअरलाइनला हटवाव्या लागल्या 6 सीट्स
7 फूट उंचीची रुमेसा गेलगीचे नाव गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये सामील आहे. तिने आता विमानातून 13 तासांचा प्रवास केला आहे. तुर्कियेच्या इस्तंबूल येथून अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोपर्यंतचा विमानप्रवास तिने केला आहे. जगातील या सर्वात उंच महिलेने स्वतःच्या जीवनात पहिल्यांदाच विमानप्रवासाचा अनुभव घेतला आहे. तिची उंची पाहता टर्किश एअरलाइन्सला स्वतःच्या इकॉनॉमी क्लासमधील 6 सीट्स हटवाव्या लागल्या आहेत.
7 फूट उंचीच्या रुमेसाकरता एअरलाइन्सने विमानाच्या 6 सीट्सना स्ट्रेचरमध्ये बदलले होते. 25 वर्षीय रुमेसा गेलगी सर्वसाधारपणे स्वतःच्या व्हिलचेअरचा वापर करते. रुमेसला वीवर सिंड्रोम असून तो एक दुर्लभ आनुवांशिक आजार आहे. यामुळे तिच्या शरीराचा विकास अत्यंत वेगाने होतो.
प्रारंभापासून अखेरपर्यंत हा एक चांगला प्रवास ठरला. हा माझा पहिला विमानप्रवास होता. परंतु निश्चितपणे हा माझा अखेरचा हवाईप्रवास नसेल. माझ्या प्रवासाचा हिस्सा ठरलेल्या प्रत्येक व्यक्तीचे मनापासून आभार मानते असे रुमेसाने सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे.
गेलगी ही सॉफ्टवेअर क्षेत्रात कार्यरत आहे. स्वतःची कारकीर्दी पुढे नेण्यासाठी आणि गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड्ससोबत सहकार्य करण्यासाठी कमीत कमी 6 महिन्यांसाठी अमेरिकेत राहणार असल्याचे गेलगीने सांगितले आहे.
2014 मध्ये जगातील सर्वात उंच महिला म्हणून गेलगीला मान प्राप्त झाला होता. तिने सर्वात लांब बोट, महिलेचा सर्वात मोठा हात इत्यादी प्रकारांमध्येही गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्वतःचे नाव नोंदविले आहे. गेलगी स्वतःच्या आजारामुळे व्हिलचेअरवर बऱयाचअंशी अवलंबून आहे. फारच कमी वेळासाठी ती चालू शकते.