Tarun Bharat

पहिली गिअर ई-दुचाकी बाजारात

चार्जवर 125 किमीचे मायलेज : किंमत 1.44 लाखाच्या आसपास

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

अहमदाबाद येथील ईव्ही स्टार्टअप कंपनी मॅटर एनर्जीने भारतामधील पहिली गिअर इलेक्ट्रिक दुचाकी सादर केली आहे. ही दुचाकी देशातील पहिली गिअर ईव्ही दुचाकी आम्ही बाजारात आणली असल्याचा दावा कंपनीने यावेळी केला आहे. यामध्ये 4 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आहे. या दुचाकीमध्ये विशेष सुविधा देण्यात आल्या असल्याची माहिती कंपनीने यावेळी दिली आहे.

कंपनीने सदरची दुचाकी ही ऑटो एक्सपो 2023 रोजी सादर केली होती, आता त्यामध्ये चार ट्रिम पर्याय असून यामध्ये 4,000, 5,000 प्लस आणि 6000 प्लस मध्ये ऑफर दिली आहे. कंपनीने ऐरा 5000 ची किमत ही 1,43,999 लाख रुपये ठेवली असून ऐरा 5000प्लसची किमत ही 1.53,999 लाख रुपये ठेवली आहे.

अन्य फिचर्स :

-एलईडी डेटाइम रनिंग मिटर

-रिव्हॉल्ट आरव्ही 400 आणि टॉर्क क्रॅटोशी स्पर्धा

-6 सेकंदामध्ये दुचाकी 0ते60 किमी प्रतितास वेगाने धावणार

-दुचाकीत तीन ड्रायव्हिंग मोडसोबत येणार

-4जी, वायफाय, ब्लूट्यूथ, पार्क असिस्ट, ओटीए अपडेट्स

-स्मार्टफोन अॅप्लिकेशन, ग्राहकांना गाडीची माहिती एकाचवेळी मिळणार

Related Stories

हिरो मोटोकॉर्पची येणार इलेक्ट्रिक दुचाकी

Patil_p

हिरोची स्कूटर-मोटारसायकल खरेदी महागणार

Patil_p

किया मोर्ट्सची विक्री 50 हजारच्या पुढे

Patil_p

पोर्शे इंडियाच्या कार विक्रीमध्ये 62 टक्के वाढ

Patil_p

बीएस- 6 श्रेणीतील होंडा ग्रेझीया नव्या रुपात

Patil_p

‘हिरो’ पुन्हा किमती वाढविण्याच्या तयारीत

Patil_p