Tarun Bharat

‘द ओर्क्स’चा फर्स्ट लुक

द लॉर्ड ऑफ द रिंग्ज सीरिज

ओर्क्स यापूर्वी ‘लॉर्ड ऑफ द रिंग्ज’ फिल्म प्रँचाइजीमध्ये दिसून आले होते. ओर्क्स आता पुन्हा परतले आहेत. आगामी सीरिज ‘द लॉर्ड ऑफ द रिंग्ज ः द रिंग्ज पॉवर’मध्ये ओर्क्स दिसून येतील. निर्मात्यांनी अमेझॉन प्राइम व्हिडिओ शोद्वारे ओर्क्सचा फर्स्ट लुक सादर केला आहे. यावेळी ‘द रिंग्ज ऑफ पॉवर’ची टाईमलाइन दुसरे युग म्हणजेच सेकंड एजमध्ये असणार आहे. म्हणजेच ओर्क्स यावेळी मिडिल -अर्थमध्ये फैलावलेले दिसून येतील.  अमेझॉन प्राइमवर ही सीरिज 2 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. ‘द रिंग्ज ऑफ पॉवर’चे प्रोस्थेटिक डिपार्टमेंटचे प्रमुख जेमी विल्सन आणि कार्यकारी निर्माते लिंडसे वेबर यांनी यासंबंधी माहिती दिली आहे. क्रीचर डिझाइन ओर्क्सचे पात्र यात अत्यंत भव्यपणे साकारण्यात आले आहे. या सीरिजबद्दल चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता लागून राहिली आहे. फिल्म फँचाइजीला मोठा प्रतिसाद मिळाला होता, यामुळे या सीरिजलाही भरघोस प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे. या सीरिजचे बजेट हजारो कोटींमध्ये आहे.

Advertisements

Related Stories

मेगाबजेट चित्रपट ‘सालार’ 14 एप्रिलला झळकणार

Patil_p

राधे, 83, सूर्यवंशीच्या प्रदर्शनात हिस्सेदारीचा अडथळा

Amit Kulkarni

सुनील तावडेंचं पाकिट म्हणतं ‘खामोश

Patil_p

मोठय़ा पडद्यावर पुनरागमन करणरा पूज भट्ट

Patil_p

‘चंद्रमुखी’ जाणार ऑन फ्लोअर

datta jadhav

‘झिम्मा’चा खेळ रंगणार 19 नोव्हेंबरपासून चित्रपटगृहात

Patil_p
error: Content is protected !!