Thackrey- Ambedkar : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि वंचित बहुजन आघाडी (व्हीबीए) यांच्यातील युतीची चर्चा मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये झाली. या भेटीनंतर दोन्ही पक्षांनी या बैठकीबाबत कमालीची गुप्तता बाळगली आहे. तसेच नियोजित स्थळी होणाऱ्या या बैठकीचे शेवटच्या क्षणी स्थळ बदलण्यात आले त्यामुळे चर्चा चांगलीच रंगू लागली आहे. उद्धव ठाकरे हे भाजपच्या विरोधात बाजू भक्कम करत असून आगामी निवडणुकांसाठी विशेषत: मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी वेगवेगळ्या पक्षांशी मोर्चेबाधणी करत आहेत.
भाजप आणि आरपीआय (आठवले) या युतीचा सामना करणे हे उद्धव ठाकरे ( Uddhav Thakrey) आणि प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar ) यांचे समान ध्येय आहे. सुमारे दोन तास चाललेल्या या बैठकीत मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar), शिवसेनेचे (ठाकरे) खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांसारखे ज्येष्ठ नेते हॉटेलमध्ये उपस्थित असले तरी ही बैठक ठाकरे आणि आंबेडकर यांच्यातच झाली. आगामी मुंबई महानगरपालिका (BMC) आणि इतर महापालिका निवडणुका, तसेच त्यांच्या जागा वाटप, तसेच वंचित बहूजन आघाडीला सामावून घेताना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला या पक्षांचाही विचार हा चर्चेचा विषय ठरण्याची शक्यता आहे. ठाकरे यांच्या सेनेशी त्यांची चर्चा सुरू असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले असून गोष्टी निश्चित झाल्यावर मीडियाला माहिती देण्यात येईल असेही ते म्हणाले.


previous post