ऑनलाईन टीम/तरुण भारत
उत्तर प्रदेशात मंत्र्याच्या राजीनाम्याने योगी आदित्यनाथांना (CM Yogi Adityanath) धक्का बसला आहे. यूपीतील भाजपचे जलसंपदा मंत्री दिनेश खटीक (Mminister Dinesh Khatik) यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने भाजपला धक्का मानला जातोय. दिनेश खाटीक यांनी थेट गृहमंत्र्यांकडे राजीनामा पाठवत नाराजी व्यक्त केली आहे.
योगी सरकारच्या मंत्रिमंडळात मोठी खळबळ उडाली आहे. तीन मंत्री राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. तर भाजपच्या पहिल्या मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. जलसंपदा मंत्री दिनेश खटीक यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah) यांच्याकडे पाठवला आहे. त्यामुळे युपीच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
हे ही वाचा : ईडी चौकशीला संजय राऊत गैरहजर; ७ ऑगस्टपर्यंतचा मागितला वेळ
दरम्यान,दिनेश खटीक यांनी दलित असल्याने अधिकाऱ्यांकडून योग्य मान-सन्मान मिळत नसल्याचा गंभीर आरोप केला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राजभवन ला देखील राजीनाम्याची प्रत पाठविल्याचे सांगितलं जात आहे. खटीक हे जलसंपदा खात्याचे राज्यमंत्री असून देखील त्यांना बैठकांचे निमंत्रण दिले जात नव्हते. आपल्यासोबत कोणत्याही बैठका घेतल्या जात नाहीत. फक्त गाडी देण्यात आली असून अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप खटीक यांनी केला आहे.