शिवस्वरुप मंदिरांमध्ये भक्तांची मोठी गर्दी : अभिषेक, पूजा-अर्चा, प्रवचन, भजन-कीर्तन आदी कार्यक्रमांचे आयोजन
वार्ताहर /किणये
तालुक्मयात पहिला श्रावण सोमवार मोठय़ा उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. तालुक्मयातील विविध गावांमधील शिवस्वरुप मंदिरांमध्ये भक्तांची मोठय़ा प्रमाणात गर्दी झाली होती. पहिल्या श्रावण सोमवारनिमित्त मंदिरांमध्ये अभिषेक, पूजा-अर्चा, भजन, प्रवचन, कीर्तन आदी कार्यक्रम झाले.
तालुक्मयातील शिवस्वरुप मंदिरांचा महिमा अगाध आहे. गावागावांमध्ये सिद्धेश्वर, कलमेश्वर, रामलिंगेश्वर, ब्रह्मलिंग आदी शंकराची पिंडी असलेली मंदिरे आहेत. या मंदिरांमध्ये श्रावणानिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सोमवारी मंदिरे फुले व हारांनी सजविण्यात आली होती. तालुक्मयात दिवसभर ‘हर हर महादेव’चा गजर झाला. मंदिरांमध्ये विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांना सोमवारपासून सुरुवात झाली आहे.
काही गावांमध्ये श्रावणात वार पाळणूक करण्याची परंपरा आहे. बहुतांश गावात वर्षभर सोमवारी कडक वार पाळणूक केली जाते.
दि. 1 रोजी सोमवारी पहाटेपासूनच शिवस्वरुप मंदिरांमध्ये दर्शनासाठी भक्तांनी गर्दी केली होती. अभिषेक व विविध पूजा करण्यात आल्या. दिवसभर भक्तांनी पहिल्या श्रावण सोमवारचे व्रत केले.
राकसकोप येथील शिवमंदिरात अभिषेक कार्यक्रम झाला. नावगे येथील रामलिंग मंदिरात पहिल्या श्रावण सोमवारनिमित्त विशेष पूजा करण्यात आली. वाघवडे येथील कलमेश्वर, झाडशहापूर येथील ब्रह्मलिंग मंदिर, मच्छे येथील ब्रह्मलिंग मंदिर, पिरनवाडी येथील सिद्धेश्वर मंदिर, मजगाव येथील ब्रह्मलिंग मंदिर, तसेच बेनकनहळ्ळी, बहाद्दरवाडी, बिजगर्णी या गावांमधील ब्रह्मलिंग मंदिरात विशेष पूजा करण्यात आली.
तारिहाळ येथील बडेकोळ मठात श्रावण महिन्याच्या निमित्ताने अभिषेक कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. मठात सोमवारी भक्तांची मोठय़ा प्रमाणात गर्दी दिसून आली. मठाधीश नागेंद्र स्वामी यांनी विधिवत नागपूजन केले. त्यानंतर भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला.
सावगाव, मंडोळी, हंगरगा, बेळगुंदी, बाकनूर, इनाम बडस, बेळवट्टी, बाळगमट्टी आदी मंदिरांमध्ये श्रावण मासानिमित्त सोमवारी धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रम झाले. काही गावांतील मंदिरांमध्ये श्रावण मासानिमित्त ज्ञानेश्वरी ग्रंथाचे वाचन करण्यास सुरुवात झाली. काही ठिकाणी तिसऱया सोमवारी तर काही गावांमध्ये चौथ्या श्रावण सोमवारी महाप्रसादाचे आयोजन केले आहे.
पहिल्या श्रावण सोमवारी राजहंसगडावर अभिषेक
येळ्ळूर : अरवाळी धरण जलतरण कमिटीमार्फत राजहंसगडावरील श्री सिद्धेश्वर मंदिरमध्ये पहिल्या श्रावण सोमवारी महाअभिषेक घालण्यात आला. यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. येळ्ळूर तसेच परिसरातील विविध संस्था- संघटना या ठिकाणी श्रावण सोमवारे महाप्रसादाचे आयोजन करतात. त्याच प्रकारे या कमिटीने पहिल्याच सोमवारी महाप्रसादाचे आयोजन करून भक्तांना वितरण केले.
यावेळी डॉ. सतीश पाटील, यल्लाप्पा तोपिनकट्टी, विनोद चतुर, तानाजी हलगेकर, डॉ. पी. टी. मुचंडी, सतीश देसूरकर, नागेश बोबाटे, अमोल जाधव, कृष्णा बिजगरकर, पांडुरंग सुळगेकर, रमेश धामणेकर, देवाजी धामणेकर, बाळू धामणेकर, प्रवीण काकतकर, परशराम चतुर, प्रशांत काळगे यांच्यासह कमिटीचे सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते.