Tarun Bharat

तेलंगणामध्ये सरकारी रुग्णालयात रुजू झाल्या पहिल्या ट्रान्सजेंडर वैद्यकीय अधिकारी

तेलंगणातील सरकारी रुग्णालयात दोन ट्रान्सजेंडर डॉक्टरांनी रुजू होत इतिहास रचला आहे. एएनआय’ या वृत्त संस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार डॉ. प्राची राठोड आणि डॉ. रुथ जॉन पॉल या उस्मानिया सामान्य रुग्णालयातरुग्णालयात रुजू होणाऱ्या पहिल्या ट्रान्सजेंडर वैद्यकीय अधिकारी आहेत.

“प्रत्येक ट्रान्सजेंडर व्यक्तीप्रमाणेच माझ्या आयुष्यातदेखील चढ-उतार होते. लहानपणी, त्यानंतर एमबीबीएसला कॉलेजमध्ये असताना आणि इमर्जन्सी फिजिशियन म्हणून काम करताना मला भेदभावाचा सामना करावा लागला.माझ्या आत्मविश्वासाच्या जोरावरच मी समाजाची सेवा करत आहे. मला कोणाकडूनही प्रेरणा मिळाली नाही. पण माझ्याकडून कोणी प्रेरणा घ्यावी, असं मला वाटतं”, अशी भावना डॉ. प्राची यांनी व्यक्त केली.

“प्रत्येक अफवेकडे दुर्लक्ष करत मी माझ्या ध्येयावर लक्ष केंद्रीत केलं. माझ्या समाजातील अनेकांनी मला यासाठी प्रोत्साहन दिलं. उस्मानियामध्ये प्रवेश घेण्यासाठीदेखील त्यांनी मदत केली. माझ्या लहाणपणीच वडिलांचे निधन झाल्यानंतर भावाने शिक्षणासाठी खूप मदत केली. ट्रान्सजेंडर लोकांसाठी असलेल्या एक सेवाभावी संस्थेच्या क्लिनिकमध्ये मी काही काळ डॉक्टर म्हणून काम केलं. त्यानंतर माझी उस्मानिया रुग्णालयासाठी निवड झाली”, अशी माहिती पॉल यांनी दिली आहे.

यावेळी प्राची आणि रूथ चे उस्मानिया सामान्य रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. नागेंद्र यांनी कौतुक केले.“उस्मानिया रुग्णालयात ट्रान्सजेंडर क्लिनिक स्थापन करण्याचा प्रस्ताव होता. त्यासाठी तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागांसाठी ३६ डॉक्टरांनी अर्ज दाखल केले होते. यापैकी आम्ही तीन ट्रान्सजेंडर डॉक्टरांची नियुक्ती केली. यामध्ये दोन ट्रान्सवुमेन तर एका एचआयव्ही ग्रस्त वैद्यकीय अधिकाऱ्याचा समावेश आहे”, अशी माहिती डॉ. नागेंद्र यांनी दिली आहे.

Related Stories

कोरोनाच्या लढाईत काँग्रेसकडून राजकारण

Patil_p

गोरखपूर, कानपूर आणि जम्मूसाठी धावणार विशेष रेल्वे गाड्या

datta jadhav

दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना कोरोनाची लागण

Abhijeet Khandekar

दहशतवादासाठी सोशल मीडियाचा वापर

Patil_p

अफगाणच्या संकटावर दाखविली एकजूट

Patil_p

पाकिस्तानी ड्रोनच्या एलओसीजवळ घिरटय़ा

Patil_p