Tarun Bharat

पहिल्या पावसात भिजतायं ! जरा थांबा, हे वाचा

Advertisements

तरुणभारत ऑनलाइन टीम

उन्हाळ्यातील उष्म्यामुळे हैराण झाल्यानंतर पहिला पाऊस जवळपास सर्वानाच हवाहवासा वाटतो.पावसाळ्यामधील थंडगार वातावरण,बाहेर पडणारा पाऊस आणि गरमागरम चहा आणि भजी याची मजा वेगळीच असते.आणि त्यात पहिल्या पावसात भिजायला कोणाला आवडत नाही.लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वचजण पहिल्या पावसाचा अगदी मनमुराद आनंद लुटताना दिसतात. मात्र जास्त प्रमाणात पावसात भिजणं देखील आपल्या आरोग्यासाठी घातक असते. यामुळे सर्दी आणि खोकला यांसारखे आजार देखील उदभवू शकतात .

उन्हाळ्यातील अति उष्णतेपासून पावसाळ्यातील थंड तापमानात प्रवेश करत असताना शरीर थंड गरम होते परिणामी आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. त्याचबरोबर पहिल्या पावसामध्ये रस्त्यावरची माती त्वचेवर जास्त येते त्यामुळे त्वचेचे नुकसान होण्याची शक्यता असते. यामुळे त्वचेवर मुरूम येऊ शकतात किंवा त्वचाविकार होऊ शकतात त्यामुळे ज्यांना अगोदरच त्वचेच्या समस्या असणाऱ्यांनी पहिल्या पावसामध्ये भिजणे टाळावे.इतकचं नाही तर पहिल्या पावसाच्या पाण्यामुळे डोक्याला खाज सुटणे किंवा कोंडा होण्याची समस्या निर्माण होते.वातावरणामध्ये अचानक बदल झाल्यामुळे शरीरामधील रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते यामुळे अनेक आजार आपल्याला होण्याची शक्यता असते.हवेतील प्रदूषण पहिल्या पावसाच्या पाण्यात मिसळते काही वेळा लोकांना त्याची जाणीव नसते ते पावसामध्ये भिजतात त्यामुळे आरोग्यावर परिणाम होतो.यामुळे पावसाळ्यात जास्त प्रमाणात भिजणं टाळलं तर आरोग्याच्या समस्या निर्माण होणार नाहीत.

Related Stories

नाकातील हाड वाढल्यास

Amit Kulkarni

कच्चे दूध पिताय ?

Omkar B

मार्जारासन

Omkar B

सतत मास्क वापरताय

Amit Kulkarni

लहान मुले आणि कोरोना

Omkar B

दुपारचे जेवण आणी आरोग्य

Amit Kulkarni
error: Content is protected !!