घेऊ शकतो 30 जणांचा जीव
ब्रिटनच्या समुद्र किनाऱयावर एक अत्यंत विषारी मासा आढळून आला आहे. हा मासा सायनाइडपेक्षा 1200 पट अधिक विषारी असतो. सायनाइड हे जगातील सर्वात धोकादायक विषांपैकी एक आहे. सायनाइडचे सेवन केल्यास काही क्षणांमध्ये माणसाचा मृत्यू होत असतो.
ब्रिटनच्या समुद्र किनाऱयावर आढळून आलेल्या माशाचे नाव ओशियनिक पफ्फर आहे. हा मासा टेट्राओडोंटिडे प्रजातीचा आहे. हा मासा अलिकडेच एका महिलेला ब्रिटनच्या समुद्र किनाऱयावर आढळून आला होता. सागरी जीवांवर संशोधन करणाऱया कॉन्स्टेंस मॉरिस स्वतःच्या कुटुंबासमवेत कॉर्नवाल समुद्र किनाऱयावर हिंडण्यासाठी गेल्या होत्या. या किनाऱयावर त्यांना एक अजब जीव पडलेला दिसून आला. नजीक जाऊन पाहिल्यावर त्यांना तेथे ओशियनिक पफ्फर हा अत्यंत विषारी मासा असल्याचे लक्षात आले.
मॉरिस यांनी ग्लोव्ह्ज परिधान करत माशाची पडताळणी केल्याने त्यांना कुठलाच धोका नव्हता. या एक माशामध्ये 30 प्रौढ व्यक्तींचा जीव घेता येईल इतके विष आहे. आतापर्यंत या विषाच्या प्रभावापासून वाचविणारे कुठलेच जीवनरक्षक औषध उपलब्ध नाही. या विषारी माशापासून अंतर राखण्याचा आणि त्याला स्पर्श न करण्याचा सल्ला तज्ञ देतात. हा मासा ब्रिटिश किनाऱयावर सापडणे दुर्लभ आहे. हा मासा महासागारांमध्ये 10 ते 475 मीटर खोलीवर आढळून येत असतो असे तज्ञांचे सांगणे आहे. मॉरिस यांनी ग्लोव्हज परिधान करून माशाला स्पर्श केल्यानेच त्या बचावल्या आहेत. किनाऱयावर आढळून आलेला मासा 12 इंच लांबीचा होता, त्यात चोचप्रमाणे दातांचा संच होता अशी माहिती मॉरिस यांनी दिली आहे.