वारणानगर / प्रतिनिधी
आरळे ता. पन्हाळा येथील तक्रारदार यांचे भाऊ यांचे पुरामध्ये मच्छीमारीचे जाळी खराब झाली त्या नुकसान भरपाईच्या अनुदानाचा प्रस्ताव श्री.खंडोबा सहकारी मच्छिमारी संस्था मर्यादित, आरळे ता.पन्हाळा संस्थेमार्फत पाठवून अनुदान मंजूर केले म्हणून सदर कामाचा मोबदला म्हणून १३ooo रुपये मागणी संस्थेचे अध्यक्ष सिताराम पाटलू पोवार रा. गोसावी गल्ली आरळे करून ती लाच स्वीकारल्याने त्यांना आज लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.
कोल्हापूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे एका अज्ञात ३५ वर्षाच्या पुरषाने तक्रार नोंदवली होती. तक्रारदार यांच्या भावाचे पुरात मच्छीमारीच्या जाळीचे नुकसान झाले होते सदरची नुकसान भरपाई शासन देते यासाठी श्री.खंडोबा सहकारी मच्छिमारी संस्था मर्यादित, आरळे ता.पन्हाळा या
संस्थेमार्फत प्रस्ताव दाखल करून त्याला अनुदान देखील मंजूर झाले होते या कामाचा मोबदला म्हणून अध्यक्ष पोवार यानी १३ हजार रू. मागणी केल्यावर त्याचा बाबत तक्रार नोंदवण्यात आली होती याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आजच गुरुवार दि. २ रोजी सापळा रचून ही कारवाई केली.
लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, पर्यवेक्षण अधिकारी तथा पोलीस उप अधीक्षक सरदार नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन कुंभार, फौजदार संजीव बंबरगेकर, पो.हे.कॉ. विकास माने, सुनिल घोसाळकर, पो.ना. सचिन पाटील, पो.कॉ.रुपेश माने, चालक पो.हे.कॉ.सुरज अपराध या सापळा पथकाने ही यशाची कारवाई करीत आरोपी सिताराम पोवार याला अटक करून कोडोली पोलीसात गुन्हा दाखल केला आहे.