गोवा एटीएस पथकाची डिचोली, हरवळेत धडक कारवाई : भंगार गोळा करण्याच्या बहाण्याने अनेक वर्षांपासून वास्तव्य
प्रतिनिधी/डिचोली, म्हापसा
अंमलीपदार्थ व्यवहारात गोवा पोलिसांची संशयास्पद भूमिक सातत्याने चर्चेत असतानाच आता गोवा पोलीस आणि बांगलादेशी घुसखोर यांचेही साटेलोटे आहेत की काय, असा संशय उपस्थित झाला आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून डिचोली, सांखळी, वाळपई परिसरात बांगलादेशी घुसखोर बेमालुमपणे राहत आहेत, आणि पोलीस, सीआयडी मात्र सुस्त होते. केंद्रातील दहशतवाद विरोधी पथकाला (एटीएस) माहिती मिळाल्यानंतर गोवा एटीएसने काल मंगळवारी डिचोलीतील बोर्डे आणि हरवळेतील प्रतापनगर भागात धडक कारवाई करुन पाच बांगलादेशी घुसखोरांच्या मुसक्या आवळल्या तर पाच जणांच्या कुटुंबाला स्थानबद्ध करण्यात यश मिळविले आहे. प्लास्टिक भंगार गोळा करण्याच्या बहाण्याने वावरत असलेले हे घुसखोर गेली अनेक वर्षे स्थानिकांच्या खोल्यांमध्ये भाडय़ाने राहत होते. या प्रकरणाने संपूर्ण गोव्यात पुन्हा एकदा खळबळ माजली असून गोव्यातील स्थानिक सुरक्षा यंणेच्या विश्वार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
बांगलादेशातून भारतात बेकायदेशीरपणे प्रवेश करून नंतर आपली ओळख बदलून राहणारे हे बांगलादेशी घुसखोर गोव्याच्या अनेक भागात वास्तव्यास आहेत. घरोघरी फिरून प्लास्टिक भंगार, बाटल्या गोळा करण्याचे काम करीत हे बांगलादेशी राज्यतील सर्व भागांमध्ये फिरत असतात. त्यांची सहज ओळख पटविणे शक्मय नसते. कारण त्यांच्याकडे भारतीय आधार कार्ड असते. आधारकार्ड बनावट वाटत असले तरी ते भारत सरकारमान्य असते, अशी धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
बोर्डेत पळ यांच्या खोलीत होते बांगलादेशी
बोर्डे येथील पळ नामक व्यक्तीच्या जगेत वास्तव्य तसेच परिसरातील भंगार गोळा करण्याचे काम करणाऱया अन्वर अखोन अबू हसन (वय 50), हसन चांद नियान (38), नुरजहाँ बेगम चांद नियान (34) व राजा अखोन (22) यांना काल मंगळवारी एटीएसने धडक कारवाईत अटक केली. हे सर्वजण राहणारे उत्तर राजापूर, पोस्ट राजापूर-बाजार, बांगलादेश येथील आहेत.
पाचहीजणांकडे आहे भारतीय आधार काड&
या पाचही बांगलादेशी घुसखोरांकडे भारतीय आधारकार्ड आढळून आले असून त्याच्या आधारे ते देशात आणि गोव्यात भ्रमंती व वास्तव्य करतात. यातील अन्वर अखोन हा दर दोन वर्षांत बांगलादेशला भेट देतो, तर हसन चांद नियान याने गेल्या चार वर्षापूर्वी बांगलादेशला भेट दिली होती. यावरुन गोव्यात बांगलादेशी घुसखोर केव्हापासून घुसले आहेत, याचा अंदाज येतो.
बांगलादेशी अन् बंगालीही घुसखोर
पळ यांच्या या जागेत लहान लहान 11 खोल्या असून त्यातील अर्ध्या खोल्या भरलेल्या आहेत. या खोल्यांमध्ये राहणारे सर्वजण परप्रांतीय असून ते सर्वचजण भंगार, प्लास्टिक बाटल्या गोळा करण्याचे काम करतात. काल पकडण्यात आलेल्या बांगलादेशी कुंटुंबासमवेत राहणारे लोक कोलकाता-बंगाल येथीलही आहेत. त्यातील बहुतेक पुरुष मंडळी ग्रामीण भागांमध्ये तसेच शहरातही फिरून भंगार गोळा करतात आणि ते नंतर मोठय़ा प्रमाणात भंगारवाल्यांना विकतात.
पाचहीजण नजरकैदेत, पोलिसांत रोज हजेरीची सक्ती
एटीएस पथकाला या कुटुंबियांची माहिती मिळताच त्यांनी त्यांची चौकशी करण्यात आली. चौकशीत पाचहीजण बांगलादेशी घुसखोर असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांना त्वरित ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांना विदेश नोंदणी अधिकाऱयांसमोर उभे करून बांगलादेशला पाठविण्याचे सोपस्कार करण्यात येणार आहेत. तोपर्यंत त्यांची संपूर्ण माहिती गोळा करून त्यांच्यावर नजर ठेवण्यात येणार आहे. त्यांना ते राहत असलेल्या खोलीतच नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. दररोज त्यांना पोलीस स्थानकात हजेरी लावण्याची सक्ती करण्यात आली आहे. त्यांचा भंगार गोळा करण्याव्यतिरिक्त इतर काही संशयास्पद कामांमध्ये सहभाग आहे का, हे तपासले जात आहे.
प्रतापनगर – हरवळे येथे पाच बांगलादेशी घुसखोर स्थानबद्ध
प्रतापनगर हरवळे येथे अशाच एका बांगलादेशी घुसखोर कुटुंबाला राहत्या खोलीतच स्थानबद्ध ठेवण्यात आले आहे. प्रतापनगर येथील वृद्ध महिलेच्या भाडय़ाच्या खोलीत हे कुटुंब राहत आहे. खोलीच्या मालकिणीने या बांगलादेशींबाबत पोलीस अर्ज भरून त्यांच्या खोलीत राहण्याचा कायदेशीर करार केला आहे. कामरून इस्लाम औलादर, भाऊ इलियास औलादर व पत्नी कुर्शिया बेगम या तिघांसह त्यांना दोन लहान मुले आहेत. हे पाच जणांचे कुटुंब उत्तर तपलबाडी, बगीरा, बांगलादेश येथील असून 2019 साली बंगळुरूमार्गे गोव्यात आले होते. सांखळीत राहण्यापूर्वी ते वाळपई येथेही काही दिवस वास्तव्यास होते. त्यानंतर गेल्या सुमारे दोन वर्षांपासून ते प्रतापनगर हरवळे येथे राहत आहेत. या कुटुंबातील दोन्ही पुरुष परिसरात फिरून भंगार व प्लास्टिक गोळा करण्याचे काम करतात. या कुटुंबालाही राहत्या खोलीत स्थानबद्ध करण्यात आले आहे. त्यांच्या हालचालींवर पोलीस लक्ष ठेवून आहेत.