Tarun Bharat

फ्रान्सच्या एम्बापेचे पाच गोल

वृत्तसंस्था/ पॅरीस

फ्रेंच चषक फुटबॉल स्पर्धेतील येथे झालेल्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात पॅरीस सेंट जर्मनने (पीएसजी) संघाने पेज डी पॅसलचा 7-0 अशा गोलफरकाने दणदणीत पराभव केला. या सामन्यात पीएसजी संघाकडून खेळणारा फ्रान्सचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्ट्रायकर कायलियान एम्बापेने हॅट्ट्रीकसह पाच गोल नेंदवले.

कतारमध्ये 18 डिसेंबर रोजी झालेल्या फिफाच्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील अर्जेंटिना विऊद्धच्या अंतिम सामन्यात एम्बापेने हॅट्ट्रीक नोंदवली होती. या सामन्यानंतर एम्बापेची आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेतील ही पहिली हॅट्ट्रीक आहे. गेल्या वर्षभराच्या फुटबॉल हंगामात एम्बापेने 24 सामन्यातून 25 गोल नोंदवले आहेत. या सामन्यासाठी पीएसजी संघाने अर्जेंटिनाचा हुकमी फुटबॉलपटू मेसीला विश्रांती दिली होती. मात्र या सामन्यात ब्राझीलच्या नेम्मारचा सहभाग होता.

पीएसजी संघाला एम्बापेने आतापर्यंत विक्रमी 14 वेळा ही स्पर्धा यापुर्वी जिंकून दिली आहे. सोमवारच्या सामन्यात 29 व्या मिनिटाला एम्बापेने पहिला गोल केला. 33 व्या मिनिटाला नेमारने पीएसजीचा दुसरा गोल केला. एम्बापेने यानंतर काही मिनिटामध्ये आणखी दोन गोल नोंदवले.

Related Stories

आशिया चषक स्पर्धेत भारत खेळणार नाही : बीसीसीआय

Patil_p

लंकन संघाच्या गोलंदाज प्रशिक्षकपदी मलिंगा

Patil_p

इशान किशन मानांकनात पहिल्या दहा खेळाडूत

Patil_p

यूएस ओपन पूर्वतयारी स्पर्धेत जोकोविच विजेता

Patil_p

भारतीय महिला फुटबॉल संघाचा इजिप्तवर विजय

Patil_p

गुजरात टायटन्सच्या लोगोचे अनावरण

Patil_p