Tarun Bharat

कुत्र्याच्या दातांनी लावला पाच लाख रुपयांचा चुना

Advertisements

अनेकांना श्वान पाळण्याचा छंद असतो. हे श्वान जणू त्यांच्या कुटुंबातलेच एक सदस्य असते. कुत्र्याची प्रकृती बिघडली तर जणू काही घरातला माणूसच आजारी पडला आहे, अशा प्रकारे त्याची बडदास्त ठेवली जाते आणि त्याच्यावर महागडे उपचारही केले जातात. अमेरिकेतील एका श्वानपेमीने आपल्या कुत्र्याचे दात स्वच्छ करण्यासाठी त्याला क्लिनिकमध्ये नेले. हे काम काही डॉलर्समध्ये होईल, अशी त्याची समजूत होती. कुत्र्याचे काही दात काढले पाहिजेत, असे डॉक्टरांनी त्याला सांगितले. त्यानुसार कुत्र्याला बेशुद्ध करण्यात आले. दोन दात काढल्यानंतर काही कारणामुळे ही प्रक्रिया लांबल्याचे त्याला सांगण्यात आले. त्यानंतर कुत्र्याच्या काही वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. त्यात कार्डियाक स्क्रिनिंग आणि रक्ताच्या तपासणीचा समावेश होता. या साऱयाचे बिल अखेरीस 8 हजार डॉलर्स किंवा भारतीय रुपयात 5 लाख रुपये इतके झाले. श्वानप्रेमीचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली. त्याने स्वतःच हा प्रसंग इंटरनेटवर प्रसिद्ध केला आहे. हा व्हिडिओ मोठय़ा प्रमाणावर पाहिला जात आहे. त्याचे नातेवाईक आणि मित्रांनीही यासाठी त्याची यथेच्छ खिल्ली उडविली. या श्वानप्रेमीच्या समाधानाची बाब एवढीच, की कुत्र्याच्या बायोप्सीतून त्याला कॅन्सर नसल्याचे आढळून आले आहे. शेवटी प्राणी पाळण्याच्या हौसेलाही मोल नसते, अशी प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहे.

Related Stories

हाताने उचलता येणारी कार

Patil_p

रशियात कोरोनामुळे दिवसात 1000 मृत्यू

Patil_p

वृक्षांच्या सालीपासून कापडाची निर्मिती

Patil_p

गव्हाच्या शेकडो दाण्यांनी साकारले ‘अटल’जीं चे भव्य रेखाचित्र

Tousif Mujawar

‘मॅन वर्सेस वाईल्ड’ मध्ये झळकणार रजनीकांत

prashant_c

जादुई आहेत 11 वर्षीय मुलीचे केस

Amit Kulkarni
error: Content is protected !!