Tarun Bharat

सातोसे ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच यांच्यासह पाच सदस्य बिनविरोध

Five members including Sarpanch unopposed in Satose Gram Panchayat elections

सातोसे ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच यांच्या सह पाच सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत… विजयी सरपंच व सदस्य गाव पॅनलचे आहेत. सरपंचपदी सौ प्रतीक्षा प्रसाद मांजरेकर या बिनविरोध निवडून आल्या. प्रभाग क्र 1 मधून सौ शुभदा सत्यवान गवंडी, सौ सृष्टी परशुराम जाधव, प्रभाग दोन मधून सौ अपर्णा उदय पेडणेकर, सौ संपदा संतोष धुरी तर प्रभाग तीन मधून शेखर बाबनी मयेकर हे बिनविरोध निवडून आले. सरपंच सौ मांजरेकर व सर्व सदस्यांचे सातोसे सरपंच बबन सातोस्कर, तंटामुक्ती अध्यक्ष वसंत धुरी सुजित सरदेसाई , रमेश पंडित व सर्व ग्रामस्थांनी अभिनंदन करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

सावंतवाडी / प्रतिनिधी

Related Stories

खेडमध्ये दोन वर्षानंतर जनावरांच्या कत्तलीची पुनरावृत्ती!

Patil_p

भात खरेदीच्या अडचणींबाबत शेतकऱयांना न्याय मिळवून द्या!

NIKHIL_N

कोमसापच्या वाङ्मयीन कार्यकर्ता पुरस्कारासाठी भरत गावडे यांची निवड

Anuja Kudatarkar

पाचल येथील एका युवा उद्योजकाची गगनभरारी, नवउद्योजकांसमोर ठेवला आदर्श

Patil_p

सर्वोच्च न्यायालयाचा ठाकरे सरकारला दणका, बहुमत चाचणीला स्थगिती देऊ शकत नाही, वाचा सुरवातीपासून ते शेवटपर्यंत

Rahul Gadkar

मेर्वी येथे भर दुपारी पाडीवर वाघाचा हल्ला

Archana Banage