Tarun Bharat

कुडचिरेच्या पंचसदस्याचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन

डिचोली/प्रतिनिधी

  वन म्हावळींगे कुडचिरे पंचायतीचे पंचसदस्य उमेश कुष्टा गावकर (वय 39) यांचे मंगळ. दि. 14 जुन रोजी रात्री ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्मयाने निधन झाले. रात्री त्यांना अस्वस्थ वाटू लागले. बेशुद्धावस्थेत डिचोली येथील सरकारी सामाजिक आयोग केंद्रात आणले असता तेथील डॉक्टरांनी उमेश गावकर यांना मृत घोषित केले.

  उमेश गावकर हे ब्राह्मणवाडा कुडचिरे येथील रहिवासी असून त्यांच्या पश्चात पत्नी व दोन पूत्र असा परिवार आहे. काल सोम. दि. 15 रोजी त्यांचा मृतदेह त्यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी आणला असता अनेकांनी त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले. मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, तसेच विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील लोकांनी त्यांचे अंतिम दर्शन घेतले. व स्थानिक स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले.

Related Stories

‘मायनिंग डंप’ निर्यातीस सरकारची मान्यता

Amit Kulkarni

बाल कलाकारांसाठी राज्यस्तरिय पौराणिक नाटय़स्पर्धा होणार-मंत्री गोविंद गावडे

Amit Kulkarni

धुकोर’ नाटक या शनिवारी मल्टीपर्पज हॉलमध्ये

Amit Kulkarni

गॅरेंजमालकही खाणी सुरू होण्याच्या प्रतिक्षेत

Patil_p

बाणावलीत पकडली बंपर सुंगटे

Amit Kulkarni

डिचोली तालुक्यात कोसळधार सुरूच

Amit Kulkarni