Tarun Bharat

काँग्रेस अध्यक्षपदासाठी आता पाच नावे चर्चेत

Advertisements

दिग्विजय सिंह, मनिष तिवारी, कमलनाथही शर्यतीत : निवडणुकीसाठी अधिसूचना जारी

नवी दिल्ली/ वृत्तसंस्था

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची संख्या वाढू लागली आहे. राहुल गांधी यांच्या नावावर सहमती होईल असे वाटत असतानाच शशी थरूर आणि अशोक गेहलोत रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर आता आणखी दोन माजी मुख्यमंत्री आणि एका माजी केंद्रीय मंत्र्यासह तीन नवीन नावे समोर आली आहेत. इच्छुकांमध्ये मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ, दिग्विजय सिंह आणि माजी केंद्रीय मंत्री मनिष तिवारी यांचा समावेश आहे.

काँग्रेस निवडणूक समितीचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांनी गुरुवारी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची अधिसूचना जारी केली. 24 ते 30 सप्टेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे. 1 ऑक्टोबर रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी झाल्यानंतर त्याच दिवशी वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 8 ऑक्टोबर आहे. काँग्रेसच्या एकापेक्षा जास्त नेत्यांनी अर्ज भरल्यास 17 ऑक्टोबरला मतदान होईल आणि 19 ऑक्टोबरला निकाल जाहीर होईल.

दिग्विजय सिंह पक्षाच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊन काँग्रेस अध्यक्ष निवडीबाबत चर्चा करण्याची शक्यता आहे. यापूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी आपण अध्यक्षपद निवडणुकीतील महत्त्वाचा स्पर्धक असल्याचे सांगितले होते. दिग्विजय सिंह यांच्याबरोबरच मनिष तिवारी यांच्याकडूनही उमेदवारी अर्ज दाखल केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांच्या निकटवर्तियांनी दिलेल्या माहितीनुसार, तिवारी पक्षाच्या राज्य प्रतिनिधींना भेटण्यासाठी आपल्या मतदारसंघात गेले होते. हे राज्य प्रतिनिधी निवडणुकीतील मतदार आहेत. प्रदेश काँग्रेस कमिटीची निवडणूक लढवण्यासाठी अध्यक्षपदाच्या प्रत्येक उमेदवाराला 10 प्रतिनिधींची आवश्यकता असते. दहा प्रतिनिधींनी प्रस्तावाला अनुमोदन दिले तरच उमेदवार अध्यक्षपदासाठी अर्ज करू शकतो.

Related Stories

मोदी सरकारने देशद्रोह केला

datta jadhav

आंध्र प्रदेश : बस-ट्रक भीषण अपघातात १३ जणांचा जागीच मृत्यू

Abhijeet Shinde

खोट्या गोष्टी पसरवून लोकांची दिशाभूल करणं हेच केंद्र सरकारचं धोरण; राहुल गांधींचे टीकसत्र सुरूच

Abhijeet Shinde

पैलवान ते डॉक्टरेट – एक प्रेरक प्रवास

Patil_p

असॉल्ट रायफल्सची अमेठीत निर्मिती

Patil_p

झोपेतून जागे व्हा आणि कोरोना समस्यांचा सामना करा – केंद्राला आयएमएने सुनावलं

Abhijeet Shinde
error: Content is protected !!