Tarun Bharat

विश्व कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये पाच ऑलिम्पिक कोटा

Advertisements

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

2023 मधील विश्व कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये 2024 ऑलिम्पिकसाठी 18 विविध वजन गटासाठी सहाऐवजी पाच कोटा स्थाने असतील, असे युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने (यूडब्ल्यूडब्ल्यू) बुधवारी पात्रतेसाठी बदल जाहीर करताना सांगितले.

16-24 सप्टेंबर या कालावधीत वर्ल्ड चॅम्पियनशिप होणार असून पॅरिस आलिम्पिकसाठी ती पहिली पात्रता स्पर्धा असेल. या स्पर्धेशिवाय कॉन्टिनेन्टल पात्रता (आशिया, आफ्रिका, अमेरिका, युरोपियन) स्पर्धा आणि 2024 वर्ल्ड ऑलिम्पिक क्वालिफायर्समध्येही कोटा स्थाने उपलब्ध असणार आहेत.

याआधी वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी 108 कोटा स्थाने (प्रत्येक ऑलिम्पिक वजनगटासाठी 6) जाहीर करण्यात आली होती. पण त्यात आता बदल करून फक्त 90 कोटा स्थाने ठेवण्यात आली आहेत. रशियातील स्पर्धेत पहिल्या पाच खेळाडूंना ऑलिम्पिक कोटा मिळेल. याचाच अर्थ असा की पहिले दोन पदकविजेते व दोन कांस्यविजेते यांना तर कांस्यसाठी प्लेऑफमध्ये पराभूत झालेल्यांत पाचव्या कोटा स्थानासाठी लढत होईल. कॉन्टिनेन्टल पात्रता स्पर्धांतून पॅरिस ऑलिम्पिकसाठी एकूण 144 मल्लांना पात्रता मिळणार आहे.

वर्ल्ड ऑलिम्पिक क्वालिफायर्समध्ये प्रत्येक वजन गटासाठी आता दोनऐवजी तीन ऑलिम्पिक कोटा दिले जातील. म्हणजे सुवर्ण व रौप्यविजेत्यासह कांस्यविजेत्यालाही आता कोटा मिळण्याची संधी आहे. यासाठी 18 विविध गटात कांस्य जिंकणाऱया खेळाडूंना कोटा मिळविण्यासाठी लढावे लागेल. ऑलिम्पिक स्पर्धेसाठी प्रवेश मिळविण्याची अंतिम तारीख 8 जुलै 2024 असून ऑलिम्पिकमधील कुस्ती प्रकार 4 ते 11 ऑगस्ट या कालावधीत खेळविला जाणार आहे.

Related Stories

बॅडमिंटन प्रशिक्षक गोपीचंद यांची 26 लाखांची मदत

Patil_p

‘फिट इंडिया’ मोहिमेत किमान 10 कोटी लोकांचा सहभाग

Patil_p

बीसीसीआयकडून विविध पदांसाठी अर्जांची मागणी

Patil_p

टायसन म्हणाला, ‘एक्स्पायरी डेट’ जवळ आली!

Patil_p

रशीद खानला पीएसएल स्पर्धेत खेळण्यासाठी ससेक्सकडून परवानगी

Patil_p

3 सुवर्ण जिंकले, तरी ड्रेसेलची ‘ती’ महत्त्वाकांक्षा अधुरीच!

Patil_p
error: Content is protected !!