Tarun Bharat

Accident : देवदर्शनाहून परतताना भीषण अपघातात पाच जण जागीच ठार

Advertisements

लातूर / प्रतिनिधी

तुळजापूर येथील देवीचे दर्शन करून पहाटेच उदगीरकडे निघालेल्या देवी भक्ताची कार व विरुद्ध दिशेने येणारी एसटी बस यांच्यात उदगीर-नळेगाव रोडवर हैबतपूर गावानजीक भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील पाच जण जागीच ठार झाले आहेत, तर एक गंभीर जखमी झाला आहे. उदगीर येथील एका रुग्णालयात काम करणारे नर्स व येथील स्टाफ देवी दर्शनासाठी गाडी करून गेले होते. आज सकाळी कामावर हजर होता येईल या ओढीने ते उदगीरकडे निघाले असता काळाने त्यांच्यावर घाला घातला.

उदगीर येथील एका हॉस्पिटलमध्ये काम करणारे महिला, पुरुष कर्मचारी गाडी करून देवी दर्शनासाठी तुळजापूरला गेले होते. दर्शन झाल्यानंतर पहाटे ते उदगीरकडे निघाले. हैबतपूर पाटीनजीक भाविकांची कार (एमएच 24-Syeer 0408) व उदगीरकडून चाकूरकडे निघालेली एसटी बस (एमएच 14-yeerìer 1375) यांच्यात आज मंगळवारी सकाळी आठच्या सुमारास भीषण अपघात झाला. बहुतेक ही दोन्ही वाहने अतिवेगात असावीत. अपघातावेळी मोठा आवाज झाला, कारचा चेंदामेंदा झाला, कारने पलटी खाल्ली.

यावेळी कारमधील अलोक तानाजी खेडकर (रा. संत कबीर नगर, उदगीर), अमोल जीवनराव देवकते (रा. रावणकोळा), कोमल व्यंकट कोदरे (रा. दोरनाळ, ता. मुखेड), यशोमती जयवंत देशमुख (रा. यवतमाळ) व नागेश ज्ञानेश्वर गुंडेवार (रा. बीदर रोड, उदगीर) हे पाच जण जागीच ठार झाले. तर गाडीतील प्रियंका गजानन बनसोडे (रा. येरोळ, ह. मु. गोपाळ नगर, उदगीर) ही तरुणी गंभीररीत्या जखमी झाली आहे.

अपघात झाल्याचे लक्षात येताच उदगीर शहर, उदगीर ग्रामीण पोलिसांनी व प्रशासनाने अपघातस्थळी धाव घेतली. अपघाताच्या ठिकाणी अक्षरशः रक्ताचा सडा पडला होता. अपघात एवढा भीषण होताच की, मयत व जखमी चित्र-विचित्र अवस्थेत अस्ताव्यस्त पडले होते. पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी सर्व मृतदेह शासकीय रुग्णालय, उदगीर येथे नेले असून तेथे मृतदेहाचे शवविच्छेदन केले जात आहे.

उदगीर येथे एका रुग्णालयात हे सर्व मयत व जखमी काम करीत होते. कमी वेळात देवी दर्शन घेऊन तातडीने कामावर हजर होण्यासाठी निघालेल्या भक्तांवर काळाने घाला घातल्याने उदगीर व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Related Stories

वीज दरामध्ये मोठी वाढ; आता युनिटनुसार कसे असणार दर, जाणून घ्या

Abhijeet Khandekar

दत्तात्रय होसबळे संघाचे नवे सरकार्यवाह

Archana Banage

कोल्हापूरकरांसाठी मोठा दिलासा; जिल्हयात दिवसभरात 1696 रुग्ण निगेटिव्ह

Archana Banage

नववर्षाच्या पहिल्या दिवशी विठोबाला ब्लू डायमंड फुलांचा साज

Archana Banage

मुंबईतील वांद्रे परिसरात चार मजली इमारतीचा भाग कोसळला; एकाचा मृत्यू

Tousif Mujawar

परराज्यातील लोक येऊन कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याची शक्यता

datta jadhav
error: Content is protected !!