पर्रा, हडफ्ढडे, नागोवा, कांदोळी, कळंगुटचा समावेश : नगर नियोजनमंत्री विश्वजित राणे यांची माहिती
प्रतिनिधी /पणजी
निलंबित करण्यात आलेल्या उत्तर गोवा बाह्य विकास आराखडा (ओडिपी) चा नगर नियोजन खात्यातफ्xढ करण्यात आलेला छाननी अहवाल विधानसभेत मांडण्यात येणार आहे. विरोध असताना आराखडय़ात समाविष्ट करण्यात आलेली गावे त्या आराखडय़ामधून वगळण्यात येणार आहेत. त्या गावांना पुन्हा मुळ दर्जा दिला जाणार असल्याची माहिती नगर नियोजनमंत्री विश्वजित राणे यांनी दिली.
बार्देश तालुक्यातील पर्रा, हडफ्ढडे, नागोवा, कांदोळी, कळंगुट ही गावे उत्तर गोवा बाह्य विकास आराखडय़ात समाविष्ट करण्यात आली होती. त्यांचा आराखडय़ात समावेश करण्यास ग्रामस्थांचा विरोध होता तरीही ती आराखडय़ात समाविष्ट करण्यात आली. त्याबाबत खात्याकडे अनेक तक्रारी आल्या परंतु त्यांची कोणी दखलच घेतली नाही. अनेक जमिनींचे झोन बदलून टाकण्यात आले आहेत. हा प्रकार गुन्हेगारी स्वरूपाचा असून त्याची गंभीर दखल घेऊन कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा मंत्री राणे यांनी दिला आहे.
छाननी अहवाल विधानसभेत सादर करणार
निलंबित करण्यात आलेल्या बाह्य विकास आराखडय़ाचा छाननी अभ्यास करण्यासाठी 10 सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली असून ती समिती आपला अहवाल खात्याला सादर करणार आहे. त्यातून बरेच काही उघड होणार असून तो अहवाल विधानसभेत मांडण्यात येणार आहे. जमिनींचे झोन बदलताना अनेक उल्लंघने करण्यात आली आहेत. त्यावरही अहवालात प्रकाश टाकण्यात येणार असून निलंबित बाह्य विकास आराखडा पुन्हा नव्याने तयार करण्याचा विचार असल्याचे मंत्री राणे यांनी स्पष्ट केले आहे.