Tarun Bharat

झंडा ऊँचा रहे हमारा!

Advertisements

आज अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन ः पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून संबोधित करणार

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

देशभर आज सोमवारी स्वातंत्र्यदिनाचा मुख्य सोहळा साजरा होणार आहे. ‘अमृतमहोत्सवा’मुळे आजचा हा सोहळा देशवासियांसाठी विशेष असणार आहे. राजधानी दिल्लीतील मुख्य सोहळय़ात पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून भाषण करणार आहेत. तेथून ते नवव्यांदा देशाला संबोधित करतील. यावेळी पंतप्रधानांचे भाषण विशेष असेल असे मानले जात आहे. तत्पूर्वी पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवताच राष्ट्रगीत सुरू होईल. त्याची सुरुवात 21 तोफांच्या सलामीने होईल. 52 सेकंदांच्या राष्ट्रगीतादरम्यान एकूण 21 तोफांची सलामी दिली जाईल. स्वातंत्र्यदिन सोहळय़ासाठी दिल्लीत जवळपास 250 मोठय़ा आसामी हजेरी लावणार आहेत. याशिवाय आठ ते दहा हजार दिल्लीकरही उपस्थित राहण्याची शक्मयता आहे.

स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवी सोहळय़ानिमित्त शनिवारपासून देशभरात ‘हर घर तिरंगा’ अभियानाला सुरुवात झाली आहे. राजधानी दिल्लीपासून गावोगावी या सोहळय़ाचा उत्साह ओसंडून वाहत आहे. दिल्लीतील मुख्य सोहळय़ावर एक हजार कॅमेऱयांच्या मदतीने लक्ष ठेवले जाणार आहे. येत्या 15 ऑगस्टला दिल्लीत दहशतवाद्यांकडून ड्रोन हल्ला केला जाऊ शकतो, असा इशारा गुप्तचर यंत्रणांकडून देण्यात आल्यामुळे दिल्लीत सध्या हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. कडेकोट सुरक्षेमुळे राजधानीला छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. देशात अन्यत्रही कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

देशात शनिवारपासून ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ मोठय़ा धूमधडाक्मयात साजरा करण्यास प्रारंभ झाला. ‘आझादी का अमृत महोत्सव’अंतर्गत ‘हर घर तिरंगा’ अभियानालाही सुरुवात करण्यात आली. प्रत्येक घराबरोबरच शासकीय, निमशासकीय, खासगी आस्थापने, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्थांच्या इमारतीवर राष्ट्रध्वज फडकवल्यामुळे सर्वत्र स्वातंत्र्यदिनाचे तेज दिसून येत होते. भारताला स्वातंत्र्य मिळून यंदा 75 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त देशभरात स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचा उत्साह पाहायला मिळत आहे. फाळणीच्या वेदनांचे स्मरण करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने रविवारी देशभरात मूक मोर्चे काढले. राजधानी दिल्लीतील जंतरमंतर येथून सायंकाळी 5 वाजल्यापासून मूक मोर्चाला प्रारंभ झाला होता. याचे नेतृत्त्व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केले.

Related Stories

ब्राझीलला मागे टाकत भारत दुसऱया स्थानी

Patil_p

जम्मू काश्मीर : माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला यांना कोरोनाची लागण

Rohan_P

विश्व हिंदू महासभा प्रदेशाध्यक्षांची हत्या

Patil_p

गणेशभक्त मुस्लीम महिलेविरोधात फतवा

Patil_p

शेतकऱ्यांच्या आंदोलनावरून संघाच्या भाजपला कानपिचक्या

Patil_p

चीनच्या आर्थिक हद्दपारीला प्रारंभ

Patil_p
error: Content is protected !!