खासदार उदयनराजे यांनी लावली हजेरी
सातारा / प्रतिनिधी
देशभर स्वातंत्र्यदिनाचा अमृतमहोत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहपुर्ण वातावरणात साजरा केला जात आहे. साताऱ्यात सुद्धा देशाचा 76 वा स्वातंत्र्य दिन सोहळा मोठ्या दिमाखात जिल्हा प्रशासनाच्यावतीने साजरा करण्यात आला. हा सोहळा जिल्हधिकारी कार्यालय सातारा यांच्या प्रांगणात पार पडला.
यावेळी राज्याचे नवनियुक्त उत्पादन आणि शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ते बोलताना म्हणाले “या देशाच्या आणि महराष्ट्राच्या जडणघडणीत सातारा जिल्ह्याचं महत्वाचं योगदान आहे. जिल्ह्यातील अनेक, स्वातंत्र्यसैनिकांनी स्वातंत्र्य चळवळीत स्वत:ला झोकून दिले. त्यांचा त्याग आपल्याला विसरता कामा नये.”
यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांची विषेश उपस्थिती होती. त्याच बरोबर जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमानंतर शहरातून दिव्यांग बांधवांनी रॅली काढण्यात आली. नविन सदर बाजार पोलीस चौकीचे उदघाटनही यावेळी करण्यात आले. पावसाची उघडीप मुळाल्याने ठिकठिकाणी मिठाईचे दुकाने लागलेली होती. स्वातंत्र्यदिनानिमित्त आज शहरात अभूतपूर्व उत्साह पहायला मिळत होता.