Tarun Bharat

जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये चकमक

Advertisements

 सुरक्षा दलांनी 2-3 दहशतवाद्यांना घेरल्यानंतर दोन्ही बाजूंनी गोळीबार

श्रीनगर / वृत्तसंस्था

शोपियानच्या हेफ शिरमल भागात शनिवारी सायंकाळी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू झाली. या भागात सुरक्षा दलांनी 2-3 दहशतवाद्यांना घेरले आहे. गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सुरक्षा दल शोध मोहिमेसाठी परिसरात पोहोचले होते. यावेळी संशयित दहशतवाद्यांना शरणागती पत्करण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र, दहशतवाद्यांनी शरणागतीचा मार्ग न पत्करता गोळीबार केल्यामुळे संघर्षाची ठिणगी पडली. दहशतवाद्यांच्या गोळीबारानंतर चकमक सुरू झाली. मात्र, रात्रीपर्यंत दोन्ही बाजूंनी कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त देण्यात आलेले नाही.

गेल्या काही दिवसात काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया मोठय़ा प्रमाणात वाढलेल्या दिसत आहेत. सुरक्षा दलांकडून वेळोवेळी जशास तसे उत्तर दिले जात आहे. तरीही सीमेपलीकडून जवळपास 150 दहशतवादी जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती गुप्तचर विभागाने जारी केली आहे. यासोबतच 11 प्रशिक्षण शिबिरांमध्ये सुमारे 500 ते 700 इतर दहशतवाद्यांचे प्रशिक्षण सुरू आहे. सुरक्षा दल सीमेपलीकडून होणाऱया चकमकीला सातत्याने हाणून पाडत असल्याचे एका वरि÷ लष्करी अधिकाऱयाने सांगितले.

यावषी नियंत्रण रेषेवरून घुसखोरीचा कोणताही प्रयत्न यशस्वी झाला नाही. दहशतवादी घुसखोरीसाठी आधीच अवलंबलेल्या मार्गांव्यतिरिक्त इतर मार्ग शोधत आहेत. तसेच स्थानिक दहशतवाद्यांना हाताशी धरून कुरापती काढण्याचा प्रयत्न करत असल्याचे सुरक्षा अधिकाऱयांचे मत आहे.

Related Stories

दीर्घ लढय़ाची मोठी तयारी

Patil_p

दोषींना अशी शिक्षा मिळेल…

datta jadhav

लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार; भाजप आमदाराविरोधात गुन्हा दाखल

Abhijeet Shinde

एका ईमेलने घडवून आणली पंतप्रधानांची भेट

Amit Kulkarni

सोमय्यांवर पुन्हा हल्ला झाल्यास ‘शूट अ‍ॅट साईट’ची ऑर्डर?

Abhijeet Shinde

चीन दूतावासाबाहेर तैवानशी संबंधित फलक

Patil_p
error: Content is protected !!