Tarun Bharat

चिपळूण, संगमेश्वर, गुहागरात पूरसदृश स्थिती

Advertisements

जोरदार पावसाने जिह्याला झोडपले

प्रतिनिधी/ चिपळूण, रत्नागिरी

जिह्यात मागील 3 दिवसांपासून पडणाऱया रिम†िझम पावसाने रविवारी झोडपून काढल़े  रत्नागिरीनजीक असणाऱया शीळ बौद्धवाडीत घरावर विजेचा पोल कोसळल़ा चिपळुणातील वाशिष्ठी व शिवनदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने येथे पूरसदृश स्थिती निर्माण झाली. संगमेश्वर तालुक्यातील फुणगूस व माखजनमधील शास्त्राr, गडनदीने पाणीपातळी ओलांडल्याने खाडीभागासह नदीकाठच्या गावातही पुरसदृश स्थिती आहे. तसेच गुहागर तालुक्यातील शृंगारतळी बाजारपेठेबरोबर गुहागर व आरे येथील मुख्य मार्गावर पाणी भरले होते. दरम्यान पुढील 2 दिवसात जिह्यात अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली असून प्रशासनाने ‘रेड अलर्ट’ जारी केला आह़े

  मुसळधार पावसामुळे जिह्यातील सर्वच प्रमुख नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आह़े तर वादळी वाऱयामुळे घरांचेही नुकसान झाल्याच्या घटना घडल्या. पावसामुळे रत्नागिरी शहरातील काही भागात रस्त्यावर पाणी साचले होत़े तसेच रत्नागिरी-गणपतीपुळे जाणाऱया रस्त्यावरील भंडारपुळे येथे समुद्राचे पाणी रस्त्यावर आल्याने वाहतूक काही काळ बंद ठेवण्यात आली होत़ी तर विविध ठिकाणी रस्त्यावर झाडे पडल्याचेही समोर आल़े दरम्यान जिह्यात कुठेही जीवितहानी झाली नसून किरकोळ स्वरूपातील नुकसान झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून जिह्यात पावसाने विश्रांती घेतली होत़ी यामुळे काही प्रमाणात शेतीच्या कामाचेही नुकसान झाल़े दरम्यान पुन्हा एकदा पावसाचा जोर जिह्यात वाढू लागला आह़े मच्छीमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जावू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आह़े 

 रविवारी पावसाने खेड तालुक्याला चांगलेच झोडपून काढले. मुसळधार पावसामुळे जगबुडी व नारंगी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. सायंकाळी उशिरापर्यंत पावसाची संततधार सुरू होती. खेड तालुक्यातील रघुवीर घाटात रविवारी सकाळी 10च्या सुमारास दरड कोसळून वाहतूक बंद झाली. दापोलीतही पावसाचा जोर वाढलेला आहे. राजापुरात अर्जुना व कोदवली नद्यांच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली आहे. लांजातही रविवारी दिवसभर पावसाने चांगलेच झोडपून काढले.

          चिपळुणात नाईक कंपनी, वडनाका, मिरजोळीत शिरले पाणी

गेल्या 2 दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे रविवारी चिपळुणातील वाशिष्ठी व शिवनदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाल्याने येथे पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. यावर्षी पहिल्यांदाच वाशिष्ठीची पाणीपातळी धोक्याच्या पातळीजवळ गेली. शहरातील नाईक कंपनी, वडनाका, मिरजोळी येथे पुराचे, तर अन्य भागात गटाराचे पाणी थेट रस्त्यावर आले. गुहागर मार्गावरील मिरजोळी-साखरवाडी येथे पुन्हा नदीचे स्वरूप आले, तर शिरळ येथील मुख्य रस्ताही पाण्याखाली गेला. यामुळे नागरिक व वाहनचालकांची गैरसोय झाल्याने त्यांनी अधिकारी व ठेकेदारांच्या नावाने शिमगा केला.

  जुलै महिन्यात चिपळुणात जोरदार पाऊस पडला. मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली होती. त्यामुळे ऐन पावसाळय़ात सूर्यदर्शन होऊन उष्माही वाढला होता. पाऊस गायब झाल्याने भातशेतीवर करपा पडतो की काय, अशी भीती शेतकरीवर्गाला सतावत होती. असे असताना गेल्या 2 दिवसांपासून पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे. रविवारी तर चिपळूण तालुक्यात मुसळधार पाऊस पडत होता. त्यामुळे शहरातून वाहणाऱया वाशिष्ठी व शिवनदीच्या पाणीपातळीत सातत्याने मोठी वाढ झाली. वाशिष्ठी व शिवनदीची इशारा पातळी 5 मीटरची असताना काही वेळासाठी वाशिष्ठीची पाणीपातळी इशारा पातळी ओलांडून धोक्याच्या 7 मीटरच्या पाणीपातळीच्या जवळ गेली होती. ती 6.60 मीटर इतकी झाली होती. मात्र त्यानंतर पावसाने विश्रांती घेतल्याने 4.62 मीटरवर आली होती.

मुसळधार पाऊस त्यातच भरती. यामुळे वाशिष्ठी नदीचे पाणी शहरातील नाईक कंपनी, शिवनदीचे वडनाका तसेच तालुक्यातील मिरजोळी-साई मंदिर जॅकवेल, साखरवाडी आदी भागातील शेतात आले आहे. तसेच अनंत आईस फॅक्टरी, लोकमान्य टिळक वाचन मंदिर, रंगोबा साबळे रोड, खेंड, महामार्ग, डीबीजे महाविद्यालय परिसर, बुरूमतळी आदी भागात गटारे तुंबल्याने पाणी थेट रस्त्यावर आले होते. यामुळे नागरिकांची दाणादाण उडाली. काही भागात याच पाण्यातून नागरिक व वाहनचालकांना मार्ग काढावा लागला. चिपळूण नगर परिषदेचे कर्मचारी भरपावसात तुंबलेली गटारे मोकळी करताना दिसत होते.

चिपळूण नगर परिषदेकडून सूचना

10 ऑगस्टपर्यंत असलेला पाऊस पडण्याचा इशारा याचा विचार करता चिपळूण नगर परिषदेकडून शहरात बसवण्यात आलेल्या पब्लिक ऍडेस सिस्टीम व शहरात वाहने फिरवून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात येत होत्या. गतवर्षीच्या महापुराच्या पार्श्वभूमीवर वाढता पाऊस व वाढलेली नद्यांची पाणीपातळी लक्षात घेता नागरिक व व्यापारी सतर्क झाले असून अनेकांनी आपले साहित्य सुरक्षितपणे उंचावर ठेवले आहे.

मिरजोळीसाखरवाडीत पुन्हा रस्त्यावर नदी

चिपळूण-गुहागर मार्गावर मिरजोळी-साखरवाडी येथे खड्डे भरण्यासह गटार काढण्याच्या कामाकडे राष्ट्रीय महामार्ग विभाग व ठेकेदाराने दुर्लक्ष केल्याने या भागात पुन्हा रस्त्यावर पाणी येऊन नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते. याच पाण्यातून वाहनचालक व ग्रामस्थांना मार्ग काढावा लागत होता. तसेच साखरवाडी येथे मुख्य रस्त्यावर झाडही कोसळले. ते उचलण्याकडेही संबंधित विभागाने दुर्लक्ष केले आहे.

शिरळ गावातील मुख्य रस्ता पाण्याखाली

शिरळ गावाकडे जाणाऱया मुख्य रस्त्यावर गेल्या काही महिन्यांपासून जोरदार पाऊस पडताच पऱयाचे पाणी मोठय़ा प्रमाणात येत आहे. त्यामुळे हा रस्ता पाण्याखाली जात असून त्यावरून प्रवास करणे कठीण बनत आहे.

अधिकारी, ठेकेदारांच्या नावाने शिमगा

चिपळूण शहरासह मिरजोळी व अन्य भागात आलेले पाणी हे अधिकारी, ठेकेदार यांच्या दुर्लक्षामुळे आले होते. त्याचा मोठा त्रास नागरिक व वाहनचालकांना सहन करावा लागत होता. त्यामुळे या रस्त्यांवर आलेल्या पाण्यातून मार्ग काढताना नागरिक व वाहनचालक नगर परिषद, राष्ट्रीय महामार्ग विभाग व ठेकेदारांच्या नावाने शिमगा करीत होते.

परशुराम घाट सुरूच

दरडी कोसळण्याची भीती असल्याने परशुराम घाट मध्यंतरी वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. मात्र आता काही अटीवर तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. रविवारी मुसळधार पाऊस असला तरी त्यावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली नव्हती. मात्र धोका नको म्हणून या मार्गावर सातत्याने गस्त घातली जात होती.

सायंकाळी पावसाचा जोर झाला कमी

चिपळूण येथे रविवारी दिवसभर मुसळधार पाऊस पडत होता. मात्र सायंकाळी पावसाचा जोर कमी झाला. त्यामुळे काही भागात शिरलेले नद्यांचे पाणी ओसरू लागले होते. सायंकाळी वाशिष्ठी नदीची बहादूरशेखनाका येथे पाणीपातळी 4.62 मीटर, बाजारपूल येथे 4.40, तर शिवनदीची 4.20 मीटर इतकी होती. रविवारी सकाळी 10 वाजेपर्यंत 61.88 मि. मी., तर आतापर्यंत 2096 मि. मी. पाऊस पडल्याची नोंद येथील पर्जन्यमापकावर झाली आहे.

Related Stories

आंजर्ले खाडीत सिद्धीसागर बोटीला जलसमाधी

Abhijeet Shinde

भाषेचे संस्कार हे नेहमीच चिरंतर- रवींद्र मडगावकर

Ganeshprasad Gogate

रत्नागिरी : चिपळूण राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष श्रीकृष्ण खेडेकर यांचे निधन

Abhijeet Shinde

‘श्रावणात बाई भाजी दर परवडेना!’

NIKHIL_N

वेंगुर्लेत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे 20 जून रोजी ज्येष्ठ नागरीकांचा सन्मान

Ganeshprasad Gogate

रत्नागिरी बसस्थानकाचे काम लवकरच पुन्हा सुरू होणार

Omkar B
error: Content is protected !!