क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
शिमोगा येथे झालेल्या तिसऱया निमंत्रितांच्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत बेळगावच्या फ्लाईंग फिट स्पोर्ट्स कराटे अकादमीच्या कराटेपटूंनी 11 सुवर्ण, 11 रौप्य, 18 कांस्यपदकासह एकूण 40 पदकांची कमाई केली.
शिमोगामध्ये झालेल्या या स्पर्धेत कटाजमध्ये श्रेया केळगडे व आराध्या सावंत यांनी सुवर्णपदक पटकावले. ईशान हेरवाडकर, साईराज पाटील, अनन्या शिंदे, वेद इंगोले, अर्णव कामण्णावर यांनी रौप्य, सृष्टी पाटील, अभय पाटील, अंकुश टोळगेकर, प्रेरणा गोधळकर, अमेय सुरेकर, अनन्या मगीशेटर, प्रणिती कश्यप, स्तुती कट्टी, क्रीवी हदिमनी, सान्वी व्ही. एच., जीनेशा हदिमनी, श्राव्या तोटगी, श्रेयस नाईक, साहिल कडोलकर, अन्विता हुद्दार यांनी कांस्यपदक पटकाविले.
कुमितेमध्ये आराध्या सावंत, सान्वी व्ही. एच., अनन्या शिंदे, अनन्या मगीशेटर, श्रेया केळगडे, तन्मई गुंडपी, रूत्वीक मोडगी, सर्फराज मुजावर, रेहान चिकोडी यांनी सुवर्णपदके मिळविली तर जीनेशा हदिमनी, अन्विता हुद्दार, प्रेरणा गोधळकर, वेद इंगोले, साईराज पाटील, आतिष देसाई यांनी रौप्य तर स्तुती कट्टी, प्रणिती कश्यप, अर्णव कामण्णावर यांनी कांस्य पदक पटकाविले. या सर्व कराटेपटूंना विनायक मोरे, चेतन मोरे, ऋतुराज कानूरकर, चेतन मिटागार, स्वप्निल मिरजकर, सोमना हल्याळ, प्रांजली पोटे, अंजली पुजारी यांचे मार्गदर्शन लाभले.