जीवनात अपयश आवश्यक, यशाच्या दबावामुळे येऊ शकते नैराश्य
सद्यकाळात पालक मुलांना गरज नसतानाच सर्व सुविधा उपलब्ध करत आहेत, परंतु याकरता पालक मुलांवर नेहमी चांगल्या गुणांना पास होण्यासाठी दबावही टाकतात. अशाप्रकारच्या हेलिकॉप्टर पॅरेंटिंगमुळे मुले चिंता तसेच नैराश्याला बळी पडत आहेत. अलिकडेच झालेल्या एका संशोधनात अपयश मुलांसाठी चांगले ठरू शकते असे समोर आले आहे.
मुलांसाठी अपयश अत्यंत सामान्य बाब आहे. मुलांची क्षमता न ओळखून घेता त्यांच्याबद्दल मत तयार करण्याच्या सवयीमुळे त्यांना मानसिक विकार होण्याचा धोका आहे. यामुळे मुले नापास होण्याच्या भीतीने आणि निर्धाराने त्याला सामोरे जाण्याऐवजी कठिण गोष्टी टाळू लागतात. याचमुळे मुलांसमोरील अडथळे दूर करण्यासाठी त्यांच्याकडे लक्ष द्यावे असे चाइल्ड माइंडसेटचे क्लीनिकल सायकोलॉजिस्ट डेव्हिड अँडरसन यांनी म्हटले आहे.
मूल एका कागदावर नापास असा शिक्का घरात घेऊन येत असल्यास त्याच्यासोबत काही वेळ घालवा, तेव्हा स्वतःची प्रतिक्रिया देणे टाळा. तत्काळ शिक्षा किंवा त्याचे अपयश तुम्हाला कसली जाणीव करून देते हे व्यक्त करण्याऐवजी त्याचे विचार जाणून घ्या. अपयश काय शिकवू शकते लक्ष केंद्रीत करा. अन्यथा प्रतिकूल मानसिकता तयार होऊ शकते असे अँडरसन यांचे म्हणणे आहे.
मुलांच्या विषयी दोषारोपणाचा प्रकार टाळण्यात यावा. संबंधित समस्या जाणून घेतल्याशिवाय मदतीसाठी पाऊल टाकू नका. मुलाला एखाद्या प्रोजेक्टमध्ये समस्या येत असल्यास किंवा तो असमर्थता व्यक्त करत असल्यास केवळ त्याचे निरीक्षण करता. जोपर्यंत तो स्पष्ट स्वरुपात मदत मागत नाही तोवर मदत करू नका असा सल्ला त्यांनी दिला आहे.
छोटय़ा मुलांसाठी हे महत्त्वपूर्ण असते की तुम्ही त्याला संघर्ष करताना पाहत आहात. समस्यांच्या उपायासाठी विचार न करता त्याची मदत करू नका. काही क्षण प्रतीक्षा करा, असे करणे खरोखरच मदतीचे ठरणार असल्याचे अँडरसन यांचे सांगणे आहे.