निवडणूक अधिकाऱयांची सूचना : वायव्य पदवीधर, वायव्य शिक्षक संघाच्या निवडणूक व्यवस्थापनाविषयी अधिकाऱयांना मार्गदर्शन
प्रतिनिधी /बेळगाव
कर्नाटक वायव्य पदवीधर आणि वायव्य शिक्षक संघाच्या निवडणुकीवेळी नियुक्त अधिकाऱयांनी आपले कर्तव्य चोख पार पाडावे, निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन होणे गरजेचे आहे. आचारसंहिता लागू असल्याने उमेदवारांच्या सभा, कार्यक्रमाचे निरीक्षण अधिकाऱयांनी करावे, अशी सूचना एन. व्ही. शिरगांवकर यांनी दिली.
बेळगाव जिल्हा पंचायत सभागृहात मंगळवारी झालेल्या कर्नाटक वायव्य पदवीधर आणि वायव्य शिक्षक संघाच्या द्विवार्षिक निवडणूक 2022 च्या व्यवस्थापनाविषयी अधिकाऱयांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी प्रशिक्षणाधिकारी म्हणून ते बोलत होते. उमेदवारांच्यावतीने प्रचार अथवा कार्यक्रम होत असल्यास त्याचे व्हिडिओ करून निवडणूक अधिकाऱयांना माहिती द्यावी, असे ते म्हणाले.
कोविड नियमावलीचे काटेकोरपणे पालन करा
प्रतिस्पर्ध्याचे चारित्र्यहनन होईल, अवहेलना, प्रक्षोभक भाषण, धार्मिक भावना दुखविणे, समाजातील शांतता भंग करणारी विधाने करणे, नवीन कामांचे उद्घाटन हे आचारसंहितेचे भंग करण्याचे प्रकार आहेत.
निवडणुकीच्या कर्तव्यांबरोबरच मास्क, सॅनिटायझर व सामाजिक अंतर या कोविड नियमावलीचे काटेकोरपणे पालन करावे. प्रत्येक महसूल तालुक्मयात किमान 3 एफएसटी संघ असणार आहेत. पैसे वाटणे, दारू वाटणे, धमकावणे, शस्त्रास्त्र बाळगणे असे प्रकार आढळल्यास याची तात्काळ माहिती वरि÷ अधिकाऱयांना देऊन कारवाई करावी, असे त्यांनी सांगितले.
पक्ष आणि उमेदवारांसबंधी नियमबाहय़ खर्च केल्याबद्दल तक्रार आल्यास याची चौकशी करून तथ्य असल्यास तेथील पोलीस स्थानकात तक्रार नोंदवावी. सभा, समारंभ, मतदार एकत्र येण्याच्या जागांवर लक्ष ठेवावे. निनावी फोन आणि तक्रारी आल्यास त्याची चौकशी करावी, असे त्यांनी सांगितले.
बुडा आयुक्त प्रितम नसलापुरे, अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, पोलीस उपायुक्त रविंद्र गडादी, जिल्हा पंचायतचे प्रमुख लेखापाल परशुराम दुडगुंटी यांच्यासह नियुक्त करण्यात आलेले अधिकारी सहभागी झाले होते.