आजकाल कलर्ड हेअरचा ट्रेंड आहे. पण हे कलर केलेले केस खूप जपावे लागतात. जर तुम्ही नॉर्मल शॅम्पूने कलर केलेले केस धुतले तर काही दिवसातच तुमच्या केसांचा रंग कमी होऊ लागतो. त्यामुळे केसांना पुन्हा पुन्हा कलर द्यावा लागतो. अशा वेळी जर तुम्हाला केसांना वारंवार कलरिंग टाळायचे असेल, तर खालील टिप्स फॉलो करा.
पॅराबेन, अमोनिया आणि सल्फेट सारखी अनेक रसायने तुमचे कलर केलेले केस त्वरीत फिकट करू लागतात, म्हणून तुम्ही केमिकल फ्री शॅम्पू वापरावा. केराटिन प्रोटीन असलेले शॅम्पू वापरण्याचा प्रयत्न करा.
आठवड्यातून एकदा माइल्ड हेअर मास्क लावावा. यामुळे तुमचे केस मऊ राहतील आणि रफनेस येणार नाही. अनेक हेअर कलर असे असतात जे लावल्यानंतर तुमचे केस खूप लवकर रफ होतात.
उन्हात किंवा बाहेर जाताना केस स्कार्फ किंवा रुमालाने कव्हर करा.
जर तुम्हाला जास्त शॉवर घ्यायचा असेल तर डोक्याला शॉवर कॅप घालावी. यामुळे तुमचा हेअर कलर जास्त काळ टिकेल.


previous post