बऱ्याच वेळेला मेकअप साफ केल्यानंतर चेहऱ्याची जळजळ होते. चुकीच्या पद्धतीने मेकअप काढल्यामुळे कदाचित हे घडू शकतं.पण मेकअप साफ करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. आज आपण मेकअप साफ करण्याचा काही सोप्या टिप्स जाणून घेऊयात.
मेकअप काढण्याचा उत्तम मार्ग म्हणजे खोबरेल तेल वापरणे. तेलाच्या मदतीने तुमचा चेहरा लगेच स्वच्छ होतो. यामुळे कोणत्याही प्रकारचा त्रास टाळता येतो. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही बेबी ऑइल देखील वापरू शकता.
तेलाने मेकअप स्वच्छ करण्यासाठी हातात थोडेसे तेल घ्या आणि नंतर चेहऱ्याला लावा. त्याच्या मदतीने चेहऱ्याला दोन ते तीन मिनिटे मसाज करा आणि नंतर कापसाच्या मदतीने चेहरा स्वच्छ करा.
मेकअप काढल्यानंतर फेसवॉशने चेहरा स्वच्छ करणे आवश्यक आहे. कारण जेव्हा तुम्ही तेलाने मेकअप साफ करता तेव्हा जास्त तेलामुळे पिंपल्स येण्याचा धोका असतो.


previous post