Tarun Bharat

सण-उत्सवाच्या काळात नागरीकांनो सतर्क राहा; पुण्यात बनावट पनीर कारखान्यावर छापा

पुण्यात मांजरीमध्ये बनावट पनीर कारखान्यावर अन्न आणि औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. यात ८९९ किलो बनावट पनीर साठा जप्त करण्यात आला आहे. असा प्रकार निदर्शनास आल्यास नागरिकांनी तात्काळ त्याबाबत माहिती द्यावी, असं आवाहन अन्न आणि औषध प्रशासनाचे पुणे विभागाचे सह आयुक्त संजय नारागुडे यांनी केलं आहे.

सध्या सणासुदीचे दिवस सुरु आहेत.याच काळात मोठ्या प्रमाणात भेसळ होण्याची शक्यता असते. आज हवेली तालुक्यातील मांजरी खुर्द इथल्या मे. आर. एस डेअरी या बनावट पनीर कारखान्यावर अन्न आणि औषध प्रशासनाने छापा मारला. यावेळी तब्बल २ लाखांचा ८९९ किलो बनावट पनीरचा साठा जप्त करण्यात आला.

बनावट पनीर बनवण्यासाठी लागणारे लाखोंचं साहित्यही यावेळी जप्त करण्यात आलंय. असा प्रकार निदर्शनास आल्यास नागरिकांनी तात्काळ त्याबाबत माहिती द्यावी, असं आवाहन अन्न आणि औषध प्रशासनाचे पुणे विभागाचे सह आयुक्त संजय नारागुडे यांनी केलं आहे. तसेच, त्यासाठी एक टोलफ्री क्रमांकही जारी केला आहे. बनावट आणि भेसळयुक्त पदार्थांची विक्री होत असल्याचं आढळून आल्यास 1800222365 या टोल फ्री क्रमांकावर तक्रार दाखल करण्यात यावी, असं आवाहन केलं आहे. तसेच, तक्रारदाराचं नाव गुप्त ठेवण्यात येणार असल्याचं आश्वासनही त्यांच्याकडून देण्यात आलं आहे.

Related Stories

कोरोनाचा फटका : शंभरावे नाट्य संमेलन पुढे ढकलले

tarunbharat

एमबीबीएसच्या परीक्षा ऑफलाईनच!

Tousif Mujawar

कोरोना संकट : पश्चिम बंगालने 31 जुलैपर्यंत वाढवला लॉक डाऊन

Tousif Mujawar

मिरजेत वृध्दाला 46 हजारांचा ऑनलाईन गंडा

Abhijeet Khandekar

कोरोना लढ्यात महाराष्ट्र सरकार अपयशी!

datta jadhav

रस्त्यावरील सुरक्षित प्रवासासाठी प्रतिज्ञा

Tousif Mujawar