कुत्रे प्रामाणिक असतात, ते ही आपल्या मालकांची काळजी करतात हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. शिमोगा जिल्ह्यातील पप्पी नावाच्या कुत्र्याचे मूकप्रेम पाहून सर्वांचे डोळे भरून आले. शिमोगा जिल्ह्यातील तीर्थहळळी तालुक्यात सोप्पूगुड्डेची रहिवासी नागरत्ना यांनी पप्पी नावाचा एक कुत्रा पाळला आहे. ४ दिवसांपूर्वी नागरत्ना यांची प्रकृती खालावली. उपचारासाठी त्यांना हास्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.यावेळी नागरत्ना कुटुंबियांसोबत पप्पीनेही ४ दिवस हास्पिटलमध्ये हजेरी लावली होती. पण उपचारादरम्यान नागरत्ना यांचे निधन झाले. पप्पीने मात्र त्यांच्या आठवणीत जेवण सोडले आहे. हास्पिटलच्या दारात पप्पी आपल्या मालकिणीची वाट पाहत असलेली छायाचित्रे डॉ. युवराज यांनी आपल्या फेसबुकपेज वर शेअर केले असून पप्पीचे मूकप्रेम पाहून सर्वांचे डोळे पाणवत आहेत.
Previous Articleआगामी निवडणुकीसाठी महाविकास आघाडी एकत्र- शरद पवार
Next Article घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल मटर पनीर