Tarun Bharat

बढतीसाठी ग्रा.पं. कर्मचार्‍यांची जि.पं.समोर निदर्शने

Advertisements


बेळगाव प्रतिनिधी
– गेल्या अनेक वर्षांपासून ग्राम पंचायतमध्ये बिल कलेक्टर म्हणून आम्ही काम करत आहे. सरकारच्या नियमानुसार आम्हाला बढती दिली पाहिजे. मात्र बढती देण्यास टाळाटाळ सुरू असल्यामुळे जिल्ह्यातील ग्राम पंचायत कर्मचार्‍यांनी जिल्हा पंचायतसमोर धरणे आंदोलन छेडून निदर्शने केली. आम्हाला बढती संदर्भात लेखी पत्र द्या, तेंव्हाच आंदोलन मागे घेवू म्हणून कर्मचार्‍यांनी दिवसभर ठाण मांडली. ग्राम पंचायतमध्ये 18 ते 20 वर्षे बिल कलेक्टर तसेच इतर कामे करणार्‍या कर्मचार्‍यांना सरकारने बढती देण्याचे आदेश दिले होते. मात्र कोरोना काळात हि प्रक्रिया थांबविण्यात आली होती. त्यानंतर सरकारने नियमानुसार आम्ही तुम्हाला बढती देवू, असे सांगितले होते. याबाबत जिल्हा पंचायतच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी यादी तयार झाल्याचे सांगितले होते.
15 सप्टेंबर रोजी हि यादी प्रसिध्द करण्यात येणार होती. मात्र ती प्रसिध्द केली गेली नाहि. त्यामुळे या कर्मचार्‍यांनी हे आंदोलन छेडले आहे. सरकारचाच आदेश आहे त्यानुसार हि बढती प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे. मात्र टाळाटाळ करत असल्यामुळे हे आंदोलन छेडण्यात आले आहे. यावेळी जे. एम. जैनेखान, यल्लाप्पा नाईक, दुंडाप्पा भजनाईक, मल्लाप्पा आलूर यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

Related Stories

पेंढारकर स्मृती नाटय़ अभिवाचन स्पर्धेत रंगभूमी ग्रुप उत्तेजनार्थ

Patil_p

कोरोना योद्धांचा सन्मान

Amit Kulkarni

उष्म्याचा तडाखा अन् कोरोनाची वाढती धास्ती!

Amit Kulkarni

अशोकनगर क्रीडा संकुलाला अद्याप टाळेच

Omkar B

लसीबाबत साशंकता नको

Amit Kulkarni

मराठा बँकेचा उद्या अमृतमहोत्सव सोहळा

Amit Kulkarni
error: Content is protected !!