Tarun Bharat

कर्नाटकात प्रथमच डी लायसन्स फुटबॉल प्रशिक्षणाला बेळगावात प्रारंभ

24 प्रशिक्षणार्थींचा सहभाग, 6 दिवस चालणार शिबिर

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव

ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन व कर्नाटक राज्य फुटबॉल संघटनेच्या मान्यतेनुसार बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना आयोजित डी लायसन्स फुटबॉल प्रशिक्षणाला मोठय़ा उत्साहात प्रारंभ झाला.

लव्हडेल स्कूलच्या स्पोर्टींग प्लॅनेट स्कूलच्या सभागृहात बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना डी लायसन्स फुटबॉल प्रशिक्षणाला प्रारंभ करण्यात आला. या प्रशिक्षणाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे प्रमुख प्रशिक्षक मारिओ अगुरिओ यांच्या मार्गदर्शनाखाली 4 जुलै ते 9 जुलै दरम्यान सुरू झाले आहे. याच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून लव्हडेल स्कूलच्या मुख्याध्यापिका आशा इंचल, पॅट्रॉन राम हदगल, संघटनेचे अध्यक्ष पंढरी परब, सचिव अमित पाटील, शिबिर प्रमुख मतिन इनामदार आदी उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थितीत शिबिराला सुरूवात करण्यात आली. या डी लायसन्स प्रशिक्षण शिबिराला 24  जणांनी भाग घेतला आहे. त्यामधील 12 जिल्हय़ातील व 12 शेजारील जिल्हय़ातील आहेत.

कर्नाटकात प्रथमच आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण या शिबिरात देण्यात येणार आहे. या शिबिरात असणार असून दर दिवशी प्रॅक्टिकल व थेरॉटीकल सत्र चालू असणार आहे. 6 दिवस चालणाऱया या शिबिराला शेवटच्या दिवशी 2 प्रॅक्टिकल व 1 थेअरी परीक्षा कोच एडिटर फॉर एआयएफएफ यांच्या मार्गदर्शनाखाली ई परीक्षा घेण्यात येणार आहे. यावेळी या सर्व 24 प्रशिक्षणपटूंना बीडीएफएतर्फे शुभेच्छा देण्यात आल्या.

Related Stories

भाजपचा ग्रामीण भागात प्रचार

Amit Kulkarni

जी. जी. सी. इंग्रजी शाळेत विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा सत्राचे आयोजन

Amit Kulkarni

ऑक्सिजनचा पुरवठा थांबविण्याचा प्रशासनाचा निर्णय जनहितविरोधी

Amit Kulkarni

घरांसाठी मंजूर झालेली उर्वरित रक्कम तातडीने द्या

Amit Kulkarni

दैवज्ञ चषक टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धा 4 जानेवारी पासून

Patil_p

निपाणीत प्लास्टिक बंदीचे ‘तीनतेरा’

Patil_p