नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशाच्या परकीय चलनसाठय़ात सलग नवव्या आठवडय़ात घट झाली आहे. 30 सप्टेंबर 2022 रोजी संपलेल्या आठवडय़ात 4.854 अब्जने घसरून 532.664 अब्ज झाल्याची आकडेवारी आरबीआयने जारी केली आहे. मुख्यत्वे विदेशी चलन मालमत्तेमध्ये घट झाल्यामुळे 30 सप्टेंबर रोजी संपलेल्या आठवडय़ात परकीय चलन साठय़ात घसरण झाली. याशिवाय गेल्या आठवडय़ात सोन्याच्या साठय़ाचे मूल्य 281 दशलक्षने घसरून 37605 अब्ज झाले आहे.
23 सप्टेंबर रोजी संपलेल्या मागील आठवडय़ात परकीय चलनसाठा 8.134 अब्ज डॉलरने घसरून 537.518 अब्ज इतका झाला होता. 16 सप्टेंबर 2022 रोजी संपलेल्या आठवडय़ात हाच साठा 5.219 अब्ज डॉलरने घसरून 545.652 अब्ज झाला. ऑक्टोबर 2021 मध्ये देशाच्या परकीय चलनसाठय़ाने 645 अब्ज इतका सर्वकालीन उच्चांक गाठला होता. भारतीय रिझर्व्ह बँकेने नुकतीच आकडेवारी जाहीर करत यासंबंधीची सविस्तर माहिती दिली आहे.