वृत्तसंस्था /नवी दिल्ली
यावर्षी जुलैमध्ये देशांतर्गत कंपन्यांची थेट विदेशी गुंतवणूक 50 टक्क्यांनी घसरून 1.11 अब्ज डॉलर झाली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) थेट विदेशी गुंतवणूक आकडेवारीनुसार, देशांतर्गत कंपन्यांनी गेल्या वर्षी जुलैमध्ये परदेशात 2.56 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली. ही गुंतवणूक इक्विटी, कर्ज आणि हमीपत्राच्या स्वरूपात करण्यात आली होती. देशांतर्गत कंपन्यांनी जुलै 2022 मध्ये इक्विटी म्हणून 57.91 कोटी रुपये, कर्ज म्हणून 19.32 कोटी रुपये आणि हमी म्हणून 33.74 कोटी रुपये गुंतवले.
काही मोठय़ा गुंतवणुकीत रिलायन्सचा समावेश
उपलब्ध माहितीनुसार, रिलायन्स इंडस्ट्रीजने सिंगापूरमधील संपूर्ण मालकीच्या ऊर्जा उपकंपनी रिलायन्स इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट्स ऍण्ड होल्डिंग्समध्ये 160 दशलक्ष डॉलर आणि यूकेमधील संपूर्ण मालकीच्या रिटेल युनिटमध्ये 4.07 दशलक्ष डॉलर गुंतवणूक केली.