Tarun Bharat

फ्रान्सच्या विदेशमंत्री बुधवारपासून भारत दौऱयावर

संरक्षणासह अनेक मुद्दय़ांवर होणार चर्चा

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

फ्रान्सच्या विदेशमंत्री कॅथरीन कोलोना या 14-15 सप्टेंबरपर्यंत भारताच्या स्वतःच्या पहिल्या अधिकृत दौऱयावर असणार आहेत. नवी दिल्ली येथील दौऱयादरम्यान कोलोना या विदेशमंत्री एस. जयशंकर यांच्यासोबत द्विपक्षीय, क्षेत्रीय तसेच आंतरराष्ट्रीय मुद्दय़ांवर चर्चा करतील. दौऱयाच्या दुसऱया दिवशी म्हणजेच 15 सप्टेंबर रोजी कोलोना या मुंबईत उद्योगजगतातील प्रतिनिधींची भेट घेणार आहेत.

फ्रान्सच्या विदेश मंत्र्यांचा दौरा व्यापार, संरक्षण, हवामान बदल, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रामधील भागीदारी अधिक मजबूत करण्याच मार्ग प्रशस्त करणारा ठरणार असल्याचे विदेश मंत्रालयाने म्हटले आहे. भारत आणि फ्रान्समधील भागीदारी आता बळकट होत आहे. दोन्ही देशांमधील आर्थिक संबंध वृद्धींगत होत आहेत.

Related Stories

सज्जाद लोन यांच्यासह पीडीपी नेत्याची सुटका

Patil_p

मुरादाबाद : ट्रक-बसच्या भीषण अपघातात 10 जणांचा मृत्यू; 20 जखमी

datta jadhav

डॉलरच्या तुलनेत रुपया वधारला

Patil_p

दिल्ली विद्यापीठ : 2 ऑगस्टपासून सुरु होणार प्रवेश प्रक्रिया

Tousif Mujawar

पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा यांचे कोरोनामुळे निधन

Tousif Mujawar

भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर

datta jadhav