प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव-चोर्ला राष्ट्रीय महामार्गाला वनखात्याने मंजुरी दिली आहे. त्यामुळे या मार्गाचा विकास होणार आहे. कर्नाटक हद्दीतील पिरनवाडी ते जांबोटी, गोवा हद्दीपर्यंत हा मार्ग केला जाणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने निर्देश दिले आहेत.
कर्नाटक आणि गोवा राज्याला जोडणाऱया या राष्ट्रीय महामार्गाला मंजुरी मिळाली आहे. यासाठी 220 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पिरनवाडी, किणये, जांबोटी, कणकुंबी आदी गावांतून हा मार्ग जाणार आहे. या कामाचे कंत्राट एनएससी प्रकल्पाला देण्यात आले आहे.
बेळगाव-रायचूर राष्ट्रीय महामार्गाला मंजुरी : भूसंपादन सुरू, लवकरच कामाला प्रारंभ


बेळगाव-रायचूर या राष्ट्रीय महामार्गाला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे या 300 किलोमीटर लांबीच्या रस्त्याला लवकरच प्रारंभ होणार आहे. या मार्गाला केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे या मार्गाचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यांनी या मार्गाला हिरवाकंदील दाखविला आहे.
या महामार्गाच्या कामासाठी भूसंपादनाची प्रक्रियाही सुरू झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग व्हावा, अशी मागणी मागील काही दिवसांपासून होती. या मागणीला यश आले आहे. या मार्गाने दोन्ही जिल्हय़ांतील वाहतूक सुरळीत होणार आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन प्रलंबित रस्ते आणि प्रकल्पांबाबत चर्चा केली आहे.