Tarun Bharat

भाजपसोबत युती करा, तरच बंड मागे? शिवसेनेतील फुटीरवाद्यांची मागणी

कोल्हापूर : विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर राज्यातील राजकारणात राजकीय अराजकता माजली आहे. शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे हे जवळपास तीस आमदारांना घेऊन नॉटरिचेबल आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या गोटात खळबळ माजली असून कोणत्याही क्षणी महाविकास आघाडीचे सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे. दरम्यान, शिवसेनेतील बंडखोर आमदारांनी भाजप सोबत युती करावी. तरच बंद मागे घेतले जातील, असा प्रस्ताव सेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जवळ ठेवला जाईल, अशी माहिती तरुण भारतच्या सूत्रांना मिळाली आहे.

अधिक वाचा : Eknath Shinde: शिवसेना नेतृत्वावर नाराज असलेले एकनाथ शिंदे आहेत तरी कोण?

दरम्यान, राज्यातील राजकीय घडामोडींने प्रचंड वेग घेतला असून भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तात्काळ अमित शहा यांच्या भेटीला गेले आहेत. तर शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे हे एक वाजता पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार आहेत. त्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले असून राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार धोक्यात आल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.

Related Stories

‘मलाही पेगॅससची ऑफर’; ममता बॅनर्जींचा मोठा खुलासा

Archana Banage

देशाच्या इंचभर जमिनीवर कोणी वाकडी नजर टाकू शकत नाही

datta jadhav

बागणीतील मंडळांचा गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय

Archana Banage

पर्यावरणासाठी पालिकेच्यावतीने आयोजित केलेल्या सायकल रॅली उत्स्फुर्त प्रतिसाद

Patil_p

‘किसन वीर’साठी आज मतदान

Patil_p

ब्रिटन चीनच्या ‘हुआवेई’ला 5G नेटवर्कमधून हटवणार

datta jadhav