Tarun Bharat

बंगालच्या उपसागरात ‘मॅन्दोस’ वादळाची निर्मिती

पुणे / प्रतिनिधी :

Formation of storm ‘Mandos’ in Bay of Bengal बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या न्यून दाबाच्या क्षेत्राचे बुधवारी रात्री ‘मॅन्दोस’ या चक्रीवादळात रुपांतर झाले. उद्या (गुरुवारी) सकाळपर्यंत हे वादळ दक्षिण आंध्र प्रदेश ते उत्तर तामिळनाडूच्या किनारपट्टीदरम्यान धडकणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान, या अलर्टमुळे नौदल, लष्कर तसेच एनडीआरएफचा ताफा सज्ज करण्यात आला आहे.

अंदमानच्या समुद्रात काही दिवसांपूर्वी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले होते. हे क्षेत्र पश्चिम-उत्तरपश्चिमेच्या दिशेने सरकत बंगालच्या उपसागरात उतरले आहे. याची तीव्रता वाढली असून, हे क्षेत्र भारतीय किनारपट्टीच्या दिशेने ताशी 15 किमी वेगाने प्रवास करीत आहे. या क्षेत्राचे बुधवारी रात्री वादळात रुपांतर होण्याचा, तर गुरुवारी सकाळी ते किनारपट्टीजवळ पोहोचण्याचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे तामिळनाडू तसेच आंध्र किनारपट्टीला ऑरेंज, तर शुक्रवारी रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यानंतर पुन्हा ऑरेंज अलर्ट आहे.

अधिक वाचा : राज्यपालांविरोधात 13 डिसेंबरला पुणे बंदची हाक

हे वादळ पश्चिम-उत्तरपश्चिमेच्या दिशेने प्रवास करणार आहे. जमिनीवर आल्यानंतर याचा प्रभाव कमी होईल. दरम्यान, स्थानिक प्रशासनाला अलर्ट देण्यात आला असून, मच्छीमारांना समुद्रात न जाण्याची सूचना आहे.

Related Stories

कोरोना विषाणू पूर्णपणे नष्ट होणे अशक्य : WHO

datta jadhav

‘हे’ राज्य घालणार ऑनलाईन गेम्सवर बंदी

datta jadhav

राज ठाकरे यांच्या घरात कोरोनाचा शिरकाव

Tousif Mujawar

उसने पैसे घेतलेल्या मानसिक तणावातून महिलेचा हृदयविकाराने मृत्यू; पोलिसात गुन्हा दाखल

Abhijeet Khandekar

बारावी विद्यार्थ्यांना वास्तव्यास असलेल्या भागात इंग्रजीचा पेपर देण्याची व्यवस्था

Tousif Mujawar

केंद्राच्या ‘त्या’ निर्णयाची मला माहिती नव्हती; नितीन गडकरींची कबुली

Archana Banage