Tarun Bharat

बीसीसीआयचे माजी सचिव अमिताभ चौधरी कालवश

Advertisements

वृत्तसंस्था/ रांची

भारतीय क्रिकेट मंडळाचे माजी कार्यकारी सचिव तसेच झारखंड राज्य क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अमिताभ चौधरी यांचे मंगळवारी सकाळी वयाच्या 58 व्या वर्षी हृदयविकाराने निधन झाले.

अमिताभ चौधरी झारखंडच्या पोलीस खात्यामध्ये निवृत्त वरिष्ठ आयपीएस अधिकारी होते. त्यांनी आयजीपी (पोलीस संचालक) म्हणून सेवा बजावली होती. झारखंडच्या क्रिकेट क्षेत्राचा झपाटय़ाने विकास साधण्यामध्ये अमिताभ चौधरी यांची कामगिरी महत्त्वाची ठरली. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी अमिताभ चौधरी यांच्या आकस्मिक निधनाबद्दल शोक व्यक्त करीत श्रद्धांजली वाहिली. पश्चिम बंगालचे तसेच बीसीसीआयचे माजी अध्यक्ष दिवंगत जगमोहन दालमिया यांच्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत बिहार क्रिकेट संघटना बरखास्त करून झारखंड क्रिकेट संघटनेला अधिकृत दर्जा देण्यात आला होता. रांचीमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्यात चौधरी यांचा महत्त्वाचा वाटा ठरला होता. अमिताभ चौधरी बीसीसीआयचे संयुक्त सचिव म्हणून काही दिवस कार्यरत होते. बीसीसीआयतर्फे चौधरी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

Related Stories

कोरोनाला नमवणारा पडिक्कल नव्या इनिंग्जसाठी सज्ज

Patil_p

राष्ट्रीय थ्रो बॉल स्पर्धा लांबणीवर

Patil_p

भारत-डेन्मार्क डेव्हिस लढत 4 मार्चपासून

Patil_p

सुरक्षितता असेल तरच राष्ट्रीय क्रिकेट शक्य : गांगुली

Patil_p

ऑस्ट्रेलियन स्पर्धेतून रशियन टेनिसपटूची माघार

Patil_p

माजी आंतरराष्ट्रीय पंच सत्याजी राव कालवश

Amit Kulkarni
error: Content is protected !!