वृत्तसंस्था / नवी दिल्ली
माजी सरन्यायाधीश ए. एम. अहमदी यांचे गुरुवारी नवी दिल्लीतील निवासस्थानी निधन झाले आहे. अहमदी हे 1994-97 पर्यंत सरन्यायाधीशपदी होते. अहमदी यांना अनेक जागतिक पुरस्कार प्राप्त झाले होते. तसेच ते अलीगढ मुस्लीम विद्यापीठाचे कुलगुरु राहिले होते. सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशपदावरून न्यायपालिकेच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचण्याची कामगिरी त्यांनी करून दाखविली होती. त्यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी शोकभावना व्यक्त केल्या आहेत.