प्रतिनिधी/इस्लामपूर
येथील मोमीन मोहल्ला परिसरातील कव्वालीच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक पीरअली पुणेकर यांनी हवेत गोळीबार केला.ही घटना सोमवारी रात्री घडली. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. इस्लामपूर पोलिसांनी शुक्रवारी पुणेकर यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.
ईद-ए-मिलादुनबी निमित्त पुणेकर हे विश्वस्त असणाऱ्या ख्वाजा गरीब नवाज सोशल वेल्फेअरच्या वतीने कव्वालीचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वरीष्ठ नेत्यांसह पदाधिकारी उपस्थित होते. कव्वाली गायन सुरु झाल्यानंतर पुणेकर हे रंगमंचाच्या एका कोपऱ्यात अवतरले. त्यांनी कमरेचे शस्त्र काढून हवेत काही फैरी झाडल्या. या घटनेचा कुणीतरी व्हिडीओ केला. हा व्हिडीओ शुक्रवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे एकच खळबळ उडाली.


पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष लागून राहिले. दरम्यान पोलिसांनी पुणेकर यांना ताब्यात घेतले.चौकशी नंतर पुणेकर यांच्यावर पुढील कारवाई काय होणार याकडे लक्ष लागले आहे.