ऑनलाईन टीम / तरुण भारत :
साताऱ्याच्या पाटण तालुक्यातील मोरणा भागात आज सायंकाळी गोळीबाराचा थरार घडला. या घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला असून, एकजण गंभीर आहे. त्याच्यावर कराडमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पवनचक्कीतील जुन्या हिशेबाच्या वादातून ठाण्यातील माजी नगरसेवकाने हा गोळीबार केला असून, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. गोळीबाराच्या या घटनेने पाटण तालुक्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मदन कदम असे या आरोपीचे नाव आहे. कदम ठाण्यातील माजी नगरसेवक असून, सध्या ते शिंदे गटात आहेत. पवनचक्कीमधील पैशांच्या हिशेबावरुन वाद झाल्याने कदम यांनी गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती मिळते. घटनेची माहिती मिळताच पोलीस फौजफाटा घटनास्थळाकडे रवाना झाला आहे.