Tarun Bharat

माजी क्रिकेट पंच कोर्टझन मोटार अपघातात ठार

Advertisements

वृत्तसंस्था/ केपटाऊन

दक्षिण आफ्रिकेचे माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेट पंच रुडी कर्टझन यांचे वयाच्या 73 व्या वर्षी मंगळवारी सकाळी मोटार अपघातात निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि चार मुले असा परिवार आहे. कर्टझन यांचे वास्तव्य रिव्हर्सडेल या शहरामध्ये होते. हा अपघात त्यांच्या शहरामध्येच मंगळवारी झाला. 1990 ते 2010 या कालावधीत कर्टझन हे आयसीसीचे जागतिक क्रिकेट क्षेत्रातील अनुभवी पंच म्हणून ओळखले गेले. त्यांनी जवळपास सुमारे 400 सामन्यात पंचगिरी केली. मंगळवारी झालेल्या मोटार दुर्घटनेत पंच कोर्टिझन यांच्यासह अन्य तीन व्यक्ती जागीच ठार झाल्या. रुडी कर्टझन केपटाऊन येथून आपल्या निवासस्थानाकडे गोल्फ खेळून येत असताना त्यांच्या मोटारीने समोरुन येणाऱया दुसऱया वाहनाला जोरदार धडक दिली. आयसीसीच्या इलाईट पंच पॅनेलमध्ये कर्टझन यांचा 2002 साली समावेश करण्यात आला होता. त्यानंतर ते तब्बल 8 वर्षे या पॅनेलमध्ये होते. त्यांनी आपल्या वैयक्तिक क्रिकेट पंच कारकीर्दीत मैदानावर तसेच तृतीय पंच म्हणून 397 सामन्यात पंचगिरी केली आहे. यामध्ये 128 कसोटी, विक्रमी 250 वनडे आणि 19 टी-20 सामन्यांचा समावेश आहे. 2007 साली झालेल्या आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील लंका ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामन्यात पंचगिरी केली होती. या सामन्यामध्ये त्यांचे काही निर्णय वादग्रस्त ठरले होते. त्यामुळे 2007 साली दक्षिण आफ्रिकेत झालेल्या पहिल्या आयसीसी टी-20 विश्व चषक क्रिकेट स्पर्धेसाठी आयसीसीने त्यांच्याशी करार केला नव्हता

Related Stories

राणी रामपालकडे महिला हॉकी संघाचे नेतृत्व

Patil_p

आशिया जेतेपदासाठी श्रीलंका-पाकिस्तान फायनल आज

Patil_p

राष्ट्रकुल हॉकीमध्ये भारताची सलामी

Patil_p

नदाल, जोकोविच, स्टीफेन्स, गॉफचे विजय

Patil_p

इंग्लंड फुटबॉल संघाला पराभवाचा धक्का

Patil_p

युफा चॅम्पियन्स लीगचा ड्रॉ जाहीर

Omkar B
error: Content is protected !!