Tarun Bharat

माजी क्रिकेटपटू फिल कार्लसन कालवश

Advertisements

वृत्तसंस्था/ मेलबर्न

ऑस्ट्रेलियाचे माजी अष्टपैलू क्रिकेटपटू फिल कार्लसन यांचे शुक्रवारी वयाच्या 70 व्या वर्षी दीर्घकालीन आजाराने निधन झाले. कार्लसन हे क्वीन्सलँड क्रिकेट क्लबचे अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून ओळखले गेले.

फिल कार्लसन यांनी 1978-79 साली इंग्लंडविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधीत्व केले होते. त्यानंतर ऍशेस मालिकेतील दोन कसोटीमध्ये ते ऑस्ट्रेलियाचे 12 वे खेळाडू होते. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये त्यांनी आपल्या वयाच्या 18 व्या वर्षी क्वीन्सलँड क्रिकेट क्लबकडून पदार्पण केले. 1969-70 साली त्यांनी आपल्या क्रिकेट कारकीर्दीला प्रारंभ केला. 1980-81 साली त्यांनी आपला शेवटचा प्रथमश्रेणी सामना क्वीन्सलँड क्लबकडून खेळला होता. ऑस्ट्रेलियन क्रिकेट क्षेत्रामध्ये कार्लसन यांचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे. 1971-72 मध्ये कार्लसन यांनी पहिले शतक तसेच गोलंदाजीत पाच गडी बाद केले होते. कार्लसन यांनी क्वीन्सलँड क्रिकेट क्लबकडून 89 प्रथमश्रेणी सामन्यात 28.97 धावांच्या सरासरीने 4144 धावा जमविल्या असून त्यांनी 24.56 धावांच्या सरासरीने 122 गडी बाद केले आहेत. क्वीन्सलँड क्रिकेट क्लबतर्फे वनडे क्रिकेटमध्ये त्यांनी 21 सामन्यात 23 बळी मिळविले. कार्लसन यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, तसेच नऊ नातवंडे असा परिवार आहे.

Related Stories

चार भारतीय मुष्टीयोद्धे उपांत्य फेरीत

Patil_p

जपानच्या विजयात ओनैवूची हॅट्ट्रिक

Patil_p

भारतीय महिला हॉकी संघ पुनरागमनास सज्ज

Patil_p

सेरेना, ओसाका पहिल्याच फेरीत पराभूत

Patil_p

अमित रोहिदासकडेच नेतृत्व, नीलमचे पुनरागमन

Patil_p

रत्नदुर्ग किल्ल्याच्या पायथ्याखाली सापडला युवतीचा मृतदेह

Patil_p
error: Content is protected !!